नंदुरबार l प्रतिनिधी
येथे मे महिन्यात बालरंगभूमी परिषद नंदुरबार जिल्हा शाखा व गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ शिंदे यांच्या संयुक्त विद्यमाने बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
अभिनयाची पाठशाळा अंतर्गत हसत खेळत बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन 2 ते 8 मे 2024 दरम्यान नंदुरबार शहरातील कमला नेहरु कॅम्पस, स्टेशन रोड येथे करण्यात आले आहे.
बालनाट्य प्रशिक्षणात वय वर्षे 8 ते 16 या वयोगटातील बालकलावंतांच्या सहभाग असणार असून प्रशिक्षण शिबिरात 40 बालकलावंतांना सहभाग मिळणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील बाल कलावंतांना नाट्यअभिनयासोबतच नाटकातील विविध अंगांची व तांत्रिक बाबींची ओळख होणार आहे. या प्रशिक्षणादरम्यान नाटकासोबतच योगा, गीत, नृत्य यांचा देखील समावेश करण्यात येणार आहे.
बालकलावंतांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टिकोनातून सदर बालनाट्य प्रशिक्षण शिबिर हे उपयोगी ठरणार आहे. म्हणूनच या बालनाट्य प्रशिक्षण शिबिरात जास्तीत जास्त बाल कलावंतांनी सहभाग घ्यावा असे आवाहन बालरंगभूमी परिषद नंदुरबार जिल्हा शाखा व गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ शिंदे यांच्यातर्फे करण्यात आले आहे. बालनाट्य प्रशिक्षण शिबिराच्या अधिक माहितीसाठी राजेश जाधव – 9922033511, नागसेन पेंढारकर – 9923129782, तुषार ठाकरे – 9403123478, राहुल खेडकर – 9422787335 यांच्याशी संपर्क साधावा.








