Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लोकसभेसाठी १८ जणांचे नामांकन दाखल, आज होणार छाननी

team by team
April 26, 2024
in राजकीय
0
लोकसभेसाठी १८ जणांचे नामांकन दाखल, आज होणार छाननी

नंदुरबार l प्रतिनिधी
लोकसभा मतदार संघासाठी शेवटच्या दिवसा अखेर 18 जणांनी नामांकन दाखल केले दरम्यान शेवटच्या दिवशी इच्छुकांसह त्यांच्या समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात गर्दी केल्याने यात्रेचे स्वरुप आले होते. काल अखेरच्या दिवशी दिवसभरात ११ इच्छूकांनी नामांकन दाखल केले. नंदुरबार लोकसभा मतदार संघासाठी एकूण १८ जणांनी नामांकन दाखल केले असून आज दि.२६ रोजी छाननी करण्यात येणार आहे.

 

नंदुरबार लोकसभा मतदार संघासाठी दि.१८ ते २५ एप्रिल या कालावधीत नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. या कालावधीत एकूण १८ इच्छूकांनी नामांकन दाखल केले आहेत. काल अखेरच्या दिवशी दिवसभरात ११ नामांकने दाखल झाली. यामध्ये भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसचे ॲड. गोवाल कागडा पाडवी यांनी शहरातून रॅली काढत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नामांकन दाखल केले.

 

 

तसेच हेमलता कागडा पाडवी यांनीही भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसतर्फे नामांकन दाखल केले आहे. तर ॲड.के.सी.पाडवी यांनी अपक्ष नामांकन दाखल केले आहे. बहुजन मुक्ती पार्टीतर्फे रोहिदास गेमजी वळवी, भारत आदिवासी पार्टीतर्फे रविंद्र रणजित वळवी, बहुजन समाज पक्षातर्फे आनंद सुकलाल कोळी, वंचित बहुजन आघाडीतर्फे हेमंत मन्साराम कोळी यांनी नामांकने दाखल केली आहेत. तसेच सुशिलकुमार जहॉँगिर पावरा, जालमसिंग सुतुम पवार, अलिबाबा रशिद तडवी व मोठाजी तुकाराम ठाकरे यांनी काल अपक्ष नामांकने दाखल केली आहेत.

 

 

तर यापूर्वीच भाजपातर्फे डॉ.हीना गावित, डॉ.सुप्रिया गावित यांनी नामांकन दाखल केले आहे. तसेच अपक्ष गोपाल सुरेश भंडारी यांनी तर पिपल्स पार्टी ऑफ इंडियातर्फे निर्मला वसावे यांच्यासह दीपककुमार मधुकर शिरसाठ, गितांजली शशिकांत कोळी, डोंगर जिभाऊ महिरम यांनी नामांकन दाखल केले. नंदुरबार लोकसभा मतदार संघासाठी एकूण १८ इच्छूकांनी नामांकने दाखल केली आहेत. आज दि.२६ रोजी छाननी प्रक्रिया पार पडणार आहे. तर दि.२९ रोजी माघारीची अंतिम मुदत असणार आहे. यामुळे १८ इच्छुकांनी नामांकने दाखल केली असली तरी प्रत्यक्षात रिंगणातील उमेदवार दि.२९ रोजी माघारीनंतरच समजणार आहेत. यामुळे आता माघारीकडे लक्ष लागले असून नेमके कोण माघार घेणार? याची चर्चा सुरु आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

रॅली महाविकास आघाडीची अन जल्लोष शिंदे गटाचा

Next Post

2 मे पासून नंदुरबारात बालनाट्य प्रशिक्षण शिबीर

Next Post
2 मे पासून नंदुरबारात बालनाट्य प्रशिक्षण शिबीर

2 मे पासून नंदुरबारात बालनाट्य प्रशिक्षण शिबीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

February 20, 2026
सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

February 20, 2026
शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

February 20, 2026
नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपरिषदा सार्वत्रिक निवडणूक-२०२५; निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर

87 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

February 20, 2026
अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

February 20, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add