नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार लोकसभेसाठी भारतीय आदिवासी पक्षाचे रवींद्र वळवी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.तिसरा पर्याय म्हणून आमच्या पक्ष निवडणूक रिंगणात असल्याचे त्यांनी सांगितले.
भारत आदिवासी पार्टीचे उमेदवार रविंद्र वळवी यांनी आज नंदुरबार लोकसभा मतदार संघासाठी आपले नामांकन दाखल केले.नामांकन दाखल करण्यासाठी प्रदेश युवक अध्यक्ष साया वसावे .भारत आदिवासी पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रुपसिंग वसावे,जिल्हा उपाध्यक्ष खेमसिंग वळवी,युवक जिल्हाध्यक्ष तुकाराम पावरा, सचिव डॉ. जयदीप वळवी,अक्कलकुवा तालुका युवक अध्यक्ष अर्जुन पाडवी मोलगी विभाग प्रमुख ॲड. रुपसिंग तडवी.,धडगांव अक्कलकुवा प्रभारी ॲड. जितेंद्र वसावे.युवक तालुका जंगलसिंग वळवी अक्कलकुवा तालुका अध्यक्ष.भिमसिंग पाडवी.अॅड संदीप वसावे.याच्या उपस्थित उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
भाजप व काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांसमोर एक तिसरा पर्याय म्हणून भारतीय आदिवासी पक्षाकडे बघितले जात आहे. या निवडणुकीत भारतीय आदिवासी पक्षाकडे सक्षम तिसरा पर्याय म्हणून पाहिले जात आहे. जिल्ह्यातील विविध समस्या आज प्रलंबित असून त्या समस्या सोडवण्यासाठी आमच्या पक्ष हा प्राध्यानाने काम करेल व चांगल्या मताधिक्याने आम्ही निवडणूक जिंकू अशी आशा उमेदवार रवींद्र वळवी यांनी व्यक्त केली.