नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार लोकसभेसाठी महाविकास आघाडीतर्फे आज काँग्रेसचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी नामांकन दाखल करणार आहेत.
25 एप्रिल 2024 रोजी सकाळी 10 वा. संजय टाऊन हॉल पासून रॅली द्वारे जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन सर्व वरिष्ठ नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार आहे. दरम्यान रॅलीस सुरुवात झाली असून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.