नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार लोकसभा निवडणूकीसाठी भारत निवडणूक आयोगाने निरिक्षक म्हणून वरिष्ठ सनदी अधिकारी डॉ. विश्वनाथ यांची नियुक्ती केली असून त्यांचे आगमन जिल्ह्यात झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनीषा खत्री यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
निवडणुक कालावधीत डॉ. विश्वनाथ यांचे निवास टोकरतलाव रोड वरील सर्किट हाऊस मधील सातपुडा कक्षात असणार आहे. तेथे नागरिकांच्या भेटीसाठी ते सकाळी 11:00 ते 12:00 या वेळेत उपस्थित राहणार आहेत. त्यांचा दूरध्वनी क्रमांक 02564-299305 असून भ्रमणध्वनी क्रमांक 7020714725 हा आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहनही जिल्हा निवडणूक अधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.