नंदुरबार l प्रतिनिधी
ग्राहक हा राजा असतो आणि ग्राहक राजाला अनेक प्रकारच्या समस्यांचे निराकरण व्हावे ह्यासाठी त भारतीय ग्राहक पंचायत नेहमीच प्रयत्नशील असते.
नंदुरबार जिल्ह्यातील ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू नये ह्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतकडून प्रत्येक तालुकास्तरावर व शहरस्तरावर कार्यकारिणी गठीत करण्यात येत आहे असे अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या जिल्हाध्यक्षा श्रीमती वंदना तोरवणे ह्यांनी म्हटले आहे.
ह्याचीच बाब म्हणून अक्राणी तालुक्यातील ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या अक्राणी तालुका अध्यक्षपदी जितेंद्र दिलीप ढोले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
या वेळी जिल्हाध्यक्षा वंदना तोरवणे,जिल्हा संघटक डी.सी.पाटील जिल्हा सदस्य गोटू पावरा,कोषाअध्यक्ष भिका चव्हाण अक्राणी तालुक्याचे वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते फेंदा पावरा,तळोदा तालुका अध्यक्षा सौ.किर्ती लोखंडे,भगवान माळी,सामाजिक कार्यकर्ते लतेश मोरे व शहरातील व्यापारी उपस्थित होते.या वेळी ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी तत्पर राहू व ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करू असे जितेंद्र ढोले ह्यांनी म्हटले आहे.