नंदुरबार l प्रतिनिधी
क्रीडा भारती नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने व मोठा मारुती संस्थान यांच्या सहकार्याने स्वर्गीय हरिश्चंद्र कन्हैयालाल सोनार यांच्या स्मरणार्थ हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य जोर मारणे स्पर्धेचे आयोजन हनुमान जयंती 23 एप्रिल 2024 रोजी दुपारी 3.30 वाजता मोठा मारुती नंदुरबार या ठिकाणी करण्यात आले असून या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते आठवी मुले लहान गट इयत्ता नववी ते बारावी मुले मोठा गट व वरिष्ठ गट खुला असे तीन गट करण्यात आले आहेत.
सदर स्पर्धेतून व्यायामाची खेळाडूंना आवड व दैनंदिन जीवनात शरीर हीच खरी संपत्ती आहे असा संदेश देत नंदुरबार जिल्ह्यातील युवकांना जोर मारण्याची स्पर्धा ही एक संधी उपलब्ध होणार आहे विजेत्या खेळाडूंना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेची नोंदणी शुल्क दहा रुपये असून स्पर्धेला विविध शाळा महाविद्यालय व्यायाम शाळा क्रीडा मंडळ तालीम यातील खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन क्रीडाभारतीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चौधरी तर मंत्री श्रीराम मोडक यांनी केलेले आहे स्पर्धा संदर्भातील अधिक माहितीसाठी जितेंद्र पगारे, प्रा.जितेंद्र माळी व मनीष सनेर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन क्रीडा भारती नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे.