नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील नेहरू पुतळा परिसरातील रघुवंशी परिवाराच्या श्रीराम मंदिरात किर्तन, महाआरती व महाप्रसाद वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविकांकडून श्रीरामांच्या जयघोष करण्यात आला.
सकाळी प्रशांत जानी महाराज यांनी श्रीरामांचे संकीर्तन केले. त्यानंतर दुपारी १२ वाजता माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी व सौ. कल्याणी यशवर्धन रघुवंशी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.यावेळी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
प्रसंगी शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी,उद्योजक मनोज रघुवंशी,इंदिरा महिला सहकारी बँकेच्या चेअरमन सौ.कविता रघुवंशी यांच्यासह भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.