Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आता वनहक्कधारकांनाही मिळणार योजनांचा लाभ; मंत्री डॉ.गावित यांनी दिली ऐतिहासिक शासन निर्णयाची माहिती

team by team
April 17, 2024
in राजकीय
0
आता वनहक्कधारकांनाही मिळणार योजनांचा लाभ; मंत्री डॉ.गावित यांनी दिली ऐतिहासिक शासन निर्णयाची माहिती

नंदुरबार l प्रतिनिधी
वैयक्तिक आणि सामूहिक वन हक्क धारकांना शासकीय योजना आणि योजनांचे लाभ यापासून वंचित ठेवणारा कायद्याचा अडसर दूर करणारा शासन निर्णय लागू करीत महाराष्ट्र राज्य शासनाने सर्व वनदावे धारकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा करून दिला आहे. या ऐतिहासिक निर्णयाची माहिती आदिवासी विकास मंत्री नामदार डॉ. विजयकुमार गावित यांनी नंदुरबार येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.

 

 

 

भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित यांचा उमेदवारी अर्ज दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी दाखल केला जाणार असून त्यासाठी राज्य पातळीवरील नेते उपस्थित राहणार आहेत. ही माहिती देण्यासाठी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी वन हक्क धारकांना देखील योजनांचा लाभ घेण्याचे अधिकार देणारा ऐतिहासिक शासन निर्णय झाल्याची माहिती दिली. नंदुरबार धुळे आणि जळगाव या जिल्ह्यात हजारोच्या संख्येने असे वन हक्क धारक आहेत.

 

त्यांच्याशी संबंधित या भल्या मोठ्या प्रश्नाची पार्श्वभूमी अशी की, अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ च्या कलम ३ (१) अन्वये अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी यांना वैयक्तिक व सामूहिक वनहक्क किंवा दोहोंचे धारणाधिकार मिळण्याचे अधिकार याच्यापूर्वीच प्राप्त झालेले आहेत. परंतु अधिनियमाच्या नियम १६ अनुसार व वनहक्क धारकांना सर्व योजनांची लाभ देण्याची तरतूद असतांना देखील वनहक्क धारकांना विविध विभागाच्या शासकीय योजनांचा लाभ मिळत नव्हते. ते देतांना भारतीय वन अधिनियमांतील तरतूदींची अडचण येत होती. दरम्यान, वनहक्क धारकांना सर्व शासकीय योजनांचा लाभ देण्या बाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन होता. त्यावर दि.११/३/२०२४ रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सदर शासन निर्णयास मान्यता देण्यात आली. आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित हे स्वतः त्यासाठी प्रयत्नशील होते.

 

दरम्यान, पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले की आता या शासन निर्णयामुळे राज्यातील वनहक्क धारकांना सर्व शासकीय योजनांचा लाभ देण्यात येईल. ज्या योजनांचे लाभ वनहक्कधारकांना त्यांच्या मागणीनुसार वैयक्तिक रित्या देणे शक्य आहे. अशा योजनांचा लाभ विनाविलंब वनहक्क धारकांना देणे शक्य होईल.

 

सामुहिकरित्या शासकीय योजनांचे लाभ वनहक्क धारकांना मिळण्याच्या दृष्टीने वनपट्टे दिलेल्या वनहक्क धारकांचे क्षेत्रनिहाय समूह (Cluster) तयार करण्यात यावेत, क्षेत्रनिहाय समूह तयार केल्यावर वनहक्क धारकांच्या मागणीनुसार ज्या योजनांचा लाभ एकत्रितरित्या वनहक्क धारकांना देणे शक्य आहे,

 

त्याबाबत कालबद्ध आराखडा तयार करून विविध शासकीय योजनांचे लाभ अभिसरणाच्या माध्यमातून वनहक्क धारकांना देण्यात यावेत. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या तालुका स्तरीय कन्व्हर्जन्स समितीने करावी, असे शासन निर्णयात म्हटले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

महायुतीच्या उमेदवार खा.डॉ. हिना गावित 22 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार

Next Post

दामदुप्पट योजना सुरू करून जिल्ह्यातील नागरिकांची चार कोटीत फसवणूक

Next Post
दामदुप्पट योजना सुरू करून जिल्ह्यातील नागरिकांची चार कोटीत फसवणूक

दामदुप्पट योजना सुरू करून जिल्ह्यातील नागरिकांची चार कोटीत फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add