नंदुरबार l प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या तथा महायुतीच्या उमेदवार खा. डॉ. हिना गावित यांनी नवापुर तालुक्यातील खांडबारा गावात संपर्क फेरी काढली. त्याप्रसंगी जागोजागी वाजंत्री च्या गजरात फुले उधळून आणि पंचारती ओवाळून स्थानिक ग्रामस्थांनी त्यांचे जोरदार स्वागत केले गेले. तरुण-तरुणींसह महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि भारतीय जनता पार्टीच्या समर्थनार्थ घोषणांमुळे भाजपा प्रभावित वातावरण बनलेले दिसले.
खा. डॉ. हिना गावित यांना भारतीय जनता पार्टीने सलग तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याला अद्याप अवकाश असला तरी खेड्यापाड्यात भेटी देऊन संपर्क करणे त्यांनी चालू ठेवले आहे. या भेटी दरम्यान गावागावातील ग्रामस्थ लोकसभेतील त्यांची कामगिरी आणि मतदारसंघात केलेली विकास कामे, यावर समाधान व्यक्त करताना दिसतात.
खांडबारा गावातही प्रमुख बाजारपेठ, जुने गाव आणि नव्या वसाहती या सर्व ठिकाणी खा. डॉ. हिना गावित यांनी प्रचारफेरी च्या माध्यमातून संपर्क केला. त्याप्रसंगी त्यांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करणाऱ्या ग्रामस्थांचा विशेषतः महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. भारतीय जनता पार्टीच्या सविता जयस्वाल यांच्यासह स्थानिक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.