नंदुरबार l प्रतिनिधी
बालरंगभूमी परिषद नंदुरबार जिल्हा शाखेच्या सन 2024-29 या पंचवार्षिक साठी बिनविरोध कार्यकारी मंडळ जाहीर करण्यात आले. राजेश जाधव यांची अध्यक्ष तर मनोज सोनार – उपाध्यक्ष, पंकज पाठक – कार्याध्यक्ष तर नागसेन पेंढारकर यांची प्रमुख कार्यवाह म्हणून यांची निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्यातील बालरंगभूमीकरिता महत्वाचे काम कार्य करणारी संस्था म्हणून बालरंगभूमी परिषद कार्य करीत असते. सदर संस्था ही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असुन या संस्थेची नंदुरबार जिल्हा शाखेची पंचवार्षिक कार्यकारणी नंदुरबार शहरातील हि.गो.श्रॉफ हायस्कूल येथे आयोजित सर्वसाधारण सभेत जाहीर करण्यात आली.
त्यात अध्यक्ष – राजेश जाधव, कार्याध्यक्ष – पंकज पाठक, उपाध्यक्ष – मनोज सोनार, प्रमुख कार्यवाह – नागसेन पेंढारकर, कोषाध्यक्ष – राहुल खेडकर, सहकार्यवाहक- तुषार ठाकरे (उपक्रम), एस.एन.पाटील (प्रशासकीय), कार्यकारणी सदस्य – रविदा जोशी, हेमंत पाटील, भीमसिंग वळवी, हरीश हराळे, मनोज वसईकर, गणेश महाजन (नवापूर), सौ.अलका विष्णू जोंधळे (शहादा), गिरीश वसावे, काशिनाथ सूर्यवंशी यांची तर जिल्हा प्रतिनिधी म्हणून कुणाल वसईकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या वेळी राज्यकार्यकारणी सदस्य नागसेन पेंढारकर यांनी बालरंगभूमी परिषदेची भूमिका विषद केली. त्यात ते म्हणाले की नंदुरबार जिल्ह्यात बाल प्रेक्षक योजना राबविण्यात येणार असुन त्यात जिल्ह्यातील सर्व शाळांचा समावेश करण्यात येणार आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश जाधव यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. त्यांनी नाटयासह नृत्य, गायन, वादन अशा विविध क्षेत्रात काम करण्याचा मानस व्यक्त केला. तसेच नाट्यप्रशिक्षणात अभिनय सोबतच विविध तंत्रांचा देखील प्रशिक्षण देऊ असे सांगितले.
तसेच शालेय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम व स्पर्धा राबविण्याचा देखील मानस व्यक्त केला. यावेळी वेळी दिग्दर्शिका क्षमा वासे-वसईकर, चिदानंद तांबोळी, जितेंद्र खवळे, कपिल पाटील, योगेंद्र पाटील, रोहित हराळे, पार्थ जाधव यांच्यासह बालरंगभूमी परिषद नंदुरबार जिल्हा शाखेचे सदस्य उपस्थित होते. नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.