Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नील पेंढारकर ठरला नंदुरबार जिह्याचा पहिला बालवैज्ञानिक

team by team
April 14, 2024
in राज्य
0
नील पेंढारकर ठरला नंदुरबार जिह्याचा पहिला बालवैज्ञानिक

नंदुरबार l प्रतिनिधी
येथील श्रीमती डी.आर.हायस्कूलचे विज्ञान शिक्षक भरत पेंढारकर व महिला बालविकास विभागतील पर्यवेक्षिका सुनिता सोनवणे (पेंढारकर) यांचा चिरंजीव चावरा स्कूलचा व एनपी फाउंडेशन नंदुरबारचा इयत्ता सहावीचा विद्यार्थी निल भरत पेंढारकर याने सन २०२३-२०२४ मध्ये घेण्यात आलेल्या डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.

 

 

.
या परीक्षेचे स्वरूप चार लेवल मध्ये असते लेखी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा व कृती संशोधन अहवाल व त्यावरील तोंडी परीक्षा या सर्व परीक्षा यशस्वीरित्या पार करून निलचा बालवैज्ञानिक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. बक्षिसाचे स्वरूप गोल्ड मेडल, सर्टफिकेट व ३००० हजार रुपये स्कॉलरशिप देऊन चर्च गेट मुंबई येथे या वर्षाचा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

 

 

तिसर्‍या व चौथ्या लेवलसाठी निवड झालेल्या महाराष्ट्रातून ३३१ विद्यार्थ्यांमधून १०% टक्के कोट्यात म्हणजेच ३१ विद्यार्थ्यांमध्ये निलची अंतिम निवड करण्यात आली. बाल वैज्ञानिक पुरस्कार मिळवलेला नंदुरबार जिल्ह्यासाठी निल पेंढारकर हा आजपर्यंत एकमेव विद्यार्थी ठरला आहे. निलने केलेल्या अथक प्रयत्नातून हे यश त्याला मिळाले आहे. त्याचावर सर्व स्तराकडून अभिनंदनचा वर्षा होत आहे. नीलच्या या यशामागे एनपी फाउंडेशनचे निलेश पाटील व बहीण श्रावणी पेंढारकर व त्याला परीक्षेच्या चारही टप्प्यावर मार्गदर्शन करणारे गुरुवर्य यांचा मोलाचा व सिंहाचा वाटा आहे.

 

 

 

 

असे ठरविले जाते बालवैज्ञानिक
बृहन्मुंबई अध्यापक मंडळातर्फे १९८१ पासून होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा घेण्यात येते. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित लेखी परीक्षा होते.

 

 

 

दुसर्‍या टप्प्यात पहिल्या परीक्षेतील ७.५ टक्के विद्यार्थ्यांचा समावेश असतो. यात त्यांची प्रयोग करण्याची क्षमता पाहिली जाते. यातील दहा टक्के विद्यार्थी पुढील टप्प्यासाठी निवडले जातात. तिसर्‍या टप्प्यात त्यांच्यातील शास्त्रज्ञाची चिकित्सक वृत्ती तपासण्यासाठी एक प्रकल्प करावा लागतो. सर्व पडताळणी केल्यानंतर मिळालेल्या गुणांची गोळाबेरीज करून बालवैज्ञानिक ठरविले जाते. तिसर्‍या व चौथ्या टप्प्याची मुलाखत सोबत मुंबई येथे घेतली जाते.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यातील उत्पादित चारा जिल्ह्याबाहेर वाहतुकीस बंदी

Next Post

बालरंगभूमी परिषद नंदुरबार जिल्हा शाखेचे कार्यकारी मंडळ जाहीर

Next Post
बालरंगभूमी परिषद नंदुरबार जिल्हा शाखेचे कार्यकारी मंडळ जाहीर

बालरंगभूमी परिषद नंदुरबार जिल्हा शाखेचे कार्यकारी मंडळ जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add