नंदुरबार l प्रतिनिधी
येथील वे. खा. भगिनी सेवा मंडळ धुळे संचलित कमला नेहरू कन्या विद्यालयात दिनांक 6 एप्रिल 2024 वार शनिवार रोजी कमला नेहरू कन्या विद्यालयात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 स्वीप कार्यक्रमांतर्गत शिक्षण विभागाने घेतलेल्या निवडणूक कार्यक्रमांतर्गत दिलेल्या नियोजनानुसार गुढी उभारण्यात आली.
लोकसभा निवडणुकीचे महत्त्व जनसामान्यांना पटवून देण्यासाठी व नंदुरबार शहरात जास्त मतदान व्हावे या उद्देशाने सदर गुढी उभारण्यात आली.
गुढीच्या माध्यमातून मतदान व जनजागृती याविषयाअंतर्गत ‘मतदान माझा हक्क’, ‘मतदान माझे कर्तव्य’, ‘मतदान करूया देश घडवूया मतदान करा चांगले नागरिक व्हा, मतदान राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो इत्यादी घोषणा देऊन जनजागृती केली. मुख्याध्यापिका श्रीमती व्ही. एन.पटेल ,उपमुख्याध्यापक एस. एम. पाटील, उपप्राचार्य बी. सी. पवार,पर्यवेक्षक डी.पी. राजपूत व एस.एन. चौधरी तसेच पी.एन. सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.