Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण

team by team
April 8, 2024
in शैक्षणिक
0
के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण

शहादा l प्रतिनिधी
येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित के.व्ही. पटेल कृषी महाविद्यालय शहादा येथे कृषकोत्सव 2024 अंतर्गत 20 वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.

कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील होते.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई पाटील, मंडळाचे संचालक नुहभाई नुरानी,महाविद्यालयाचे देणगी दाते काशिनाथ पटेल, मगन पटेल,एकनाथ पटेल,विनोद पटेल (पिंपळोद),मराठी सिनेअभिनेत्री तथा महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थीनी निकिता मोरे,शुराय फाऊडेशन नाशिकचे पराग पाटील, मंडळाच्या विविध विद्याशाखांचे प्राचार्य प्रमुख उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करतांना अभिनेत्री निकिता मोरे यांनी सांगितले की,यशस्वी जीवनासाठी कष्टांना सामोरे जावे लागते.त्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना कठीण परिश्रम घेतले पाहिजे.

पराग पाटील मनोगत व्यक्त करतांना म्हणाले,विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता विविध व्यावसायिक संधी शोधल्या पाहिजे.स्वयं रोजगार उभारून स्वतः सह समाजाची प्रगती साधली पाहिजे.

मयूरभाई पाटील यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले, जीवनात यश-अपयश येत असते.अपयशाने खचून न जाता जिद्दीने आपल्या आवडीच्या क्षेत्रातील संधी शोधली पाहिजे.विद्यार्थ्यांनी ज्ञान वृध्दीसाठी जागतिक घडामोडींचा अभ्यास करून माहिती घ्यावी. मार्गदर्शन केले.जगदीश पाटील यांनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील,सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूरभाई दीपक पाटील, प्राचार्य डॉ.पी.एल.पटेल यांनी केले.

अहवाल वाचन विद्यार्थी प्रतिनिधी विनीत पाटील यांने केले.प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार प्राचार्य डॉ.प्रकाश पटेल यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.सी. यू.पाटील यांनी केले.आभार प्रदर्शन डॉ.बी.सी.चौधरी यांनी मानले.यावेळी कृषकोत्सव 2024अंतर्गत विविध परीक्षा, प्रात्यक्षिक,उपक्रम,खेळ आदिंत यशस्वी व नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

बातमी शेअर करा
Previous Post

देशाच्या विकासात राजपूत युवा युवतींचे कार्य प्रेरणादायी व प्रशंसनीय : उपमुख्यमंत्री ना.दिया कुमारी

Next Post

कमला नेहरू कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात स्वीप कार्यक्रमांतर्गत उभारण्यात आली गुढी

Next Post
कमला नेहरू कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात स्वीप कार्यक्रमांतर्गत उभारण्यात आली गुढी

कमला नेहरू कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात स्वीप कार्यक्रमांतर्गत उभारण्यात आली गुढी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026
खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

February 7, 2026
नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

February 7, 2026
नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी  आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

February 7, 2026
उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

February 7, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add