नंदुरबार l प्रतिनिधी
काँग्रेसतर्फे राज्यातील 7 लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली.यात नंदुरबार लोकसभेसाठी माजी मंत्री ॲड.के सी.पाडवी यांचे सुपुत्र ॲड. गोवाल के.पाडवी यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
ॲड. गोवाल के.पाडवी यांचा जन्म मुंबई येथे 1992 साली झाला.मुंबई येथेच त्यांनी एल.एल.एम चे शिक्षण घेतले.उच्च न्यायालयात ते वकिली करीत आहे.गेल्या तीन चार वर्षापासून सातपुड्यात ते सामाजिक काम करीत आहे. काँग्रेसने आश्चर्याचा धक्का देत ॲड. गोवाल के.पाडवी यांचे नाव घोषित केल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
त्यांचा सामना भाजपच्या खा.डॉ.हिना गावीत यांच्याशी होणार आहे.2019 साली खा.डॉ.हिना गावीत यांनी
माजी मंत्री ॲड.के सी.पाडवी यांचा सुमारे 95 हजारांनी पराभूत केले होते. ॲड. गोवाल के.पाडवी असून त्यांचा सातपुडा सोडला तर इतर भागात संपर्क नाही आहे.