नंदुरबार l प्रतिनिधी
राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे मोफत आयुष सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.वर्षा शिवाजी लहाडे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात २३८ रुग्णांची तपासणी करण्यात आली व ३४ रुग्णांना संदर्भ सेवेकरिता पाठविण्यात आले.
यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ.आनंद जामकर, अतिरिक्त जिल्हाशल्य चिकित्सक डॉ.कांताराव सातपुते यावेळी उपस्थित होते. शिबिरात आयुर्वेदिक व पंचकर्म, योग व निसर्गोपचार, युनानी व इलाज बिर तदबीर आणि होमिओपॅथीने रुग्णांना उपचार करण्यात आले. यावेळी आयुष चिकित्सा पद्धतीचा रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. वर्षा लहाडे यांनी केले.
सूत्रसंचालन चंद्रशेखर वसईकर यांनी तर आभार जिल्हा आयुष अधिकारी डॉ.दुर्गेश शहा यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.नितीन वळवी, डॉ.कविता बेहेरे, डॉ.ज्योती वाल्हे, डॉ.रिजवान सय्यद, डॉ.रिझवान रंगरेज, गोपाळ बूनकर, कविता गावित व जगदीश परदेशी यांनी परिश्रम घेतले.