Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आ.आमश्या पाडवी यांनी त्वरित राजीनामा द्यावा, शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून जाहीर निषेध

team by team
March 19, 2024
in राजकीय
0
आ.आमश्या पाडवी यांनी त्वरित राजीनामा द्यावा, शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून जाहीर निषेध

नंदुरबार l प्रतिनिधी

काल विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी ठाकरे गटाला रामराम करत शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातील पदाधिकारी हे चांगलेच नाराज झाले असून त्यांच्यात असंतोष पसरला आहे. त्यामुळे त्यांनी आमदार आमश्या पाडवीचा जाहीर निषेध करून राजीनामा देण्याची मागणी केली आहे.

नंदुरबार येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, युवा जिल्हाध्यक्ष यांच्या सह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक अटल बिहारी वाजपेयी सभागृहात घेण्यात आली. या बैठकीत एकमताने ठराव करून आमदार आमश्या पाडवी यांच्या निषेध करण्यात आला. शिवसेना उद्धव साहेब ठाकरे गटाकडून 2022 साली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुवत नसतांना आंमश्या पाडवी यांना आमदार बनवले याचे कारण नंदुरबार जिल्हा दुर्लक्षित व दुर्गम भाग आहे याचा विकास व्हावा म्हणून यांना आमदार बनवले परंतु आमश्या पाडवीनी स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेनेसोबत गद्दारी केली आहे .

म्हणून जर यांच्यात जराही नैतिकता असेल तर त्यांनी त्वरित आमदार पदाचा राजीनामा द्यावा आणि मग शिवसेनेला आव्हान द्यावे असे शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी आमदार आमश्या पाडवी याचा जाहीर निषेध केला आहे.

यावेळी सहसंपर्कप्रमुख अरुण चौधरी, जिल्हा समन्वयक दीपक गवते, जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी, नवापूर येथील उपजिल्हाप्रमुख गोटू पाटील, युवती सेना राज्यसहसचिव मालती वळवी, महिला आघाडी जिल्हा संघटक रीना पाडवी, जिल्हा युवा सेना अधिकारी अर्जुन मराठे, माजी तालुकाप्रमुख रमेश पाटील, शहर प्रमुख राजधर माळी, शहादा तालुकाप्रमुख राजु लोहार, शहर प्रमुख सागर चौधरी, तळोदा उपजिल्हाप्रमुख आनंद सोनार, शहर प्रमुख जितेंद्र दुबे, जिल्ह्यातील पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.
यासंदर्भात बैठकीचे आवाहन जिल्हा महानगरप्रमुख पंडित माळी यांनी केले होते.

बातमी शेअर करा
Previous Post

काकडदा येथे होळीच्या पार्श्वभुमीवर संयुक्त ग्रामसभा

Next Post

खा. डॉ.हिना गावित ‘डॉक्टरकी’ला अशा जागल्या

Next Post
खा. डॉ.हिना गावित ‘डॉक्टरकी’ला अशा जागल्या

खा. डॉ.हिना गावित 'डॉक्टरकी'ला अशा जागल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026
थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

February 12, 2026
जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास  मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

February 12, 2026
नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add