नंदुरबार l प्रतिनिधी
शेतजमिनीची नवीन मोजणी करण्यासाठी शहादा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील शिपायाने शेतकऱ्याकडून ३ हजाराची लाच मागितली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्याला रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती अशी की, शहादा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई विनोद बाळू शिंदे हा तीन हजाराची लाच घेताना पकडला गेला. तक्रारदार यांची भूमी अभिलेख कार्यालयामार्फत मोजणी करण्यात आलेली होती. परंतू काही कारणास्तव तक्रारदार यांना शेतजमिनीची नव्याने
मोजणी करावयाची होती. यादरम्यान विनोद शिंदे
यांनी तक्रारदार यांना विचारले असता तुमच्या
शेतात येऊन मोजणी करून देवू परंतु याचा मोबादला द्यावा लागेल अशी अट घातली.