नंदुरबार | प्रतिनिधी-
कॉंग्रेस पक्ष पाच न्यायावर काम करत आहे. यात महिला सक्षमीकरण, शेतकर्यांना न्याय, युवकांना रोजगार, श्रमिकांना आधार, सामाजिक न्याय यांचा समावेश आहे. ही एका व्यक्तीची गॅरेंटी नसून संपुर्ण पक्षाची गॅरेंटी आहे, असे प्रतिपादन काँग्रसचे केंद्रीय नेते जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत केले.
खा.राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. त्या पार्श्वभुमीवर कॉंग्रेसचे केंद्रीय तसेच राज्यस्तरीय नेते नंदुरबारात आले आहेत. या भारत जोडो यात्रेची माहिती देण्यासाठी जयराम रमेश पत्रकार परिषदेत बोलत होते. श्री.रमेश म्हणाले, कॉंग्रेस पक्षातर्फे खा.राहूल गांधी यांनी दि.१४ जानेवारीपासून मणिपूर राज्यापासून भारत जोडो यात्रा सुरु केली आहे. चार हजारावर किमी अंतर पार करुन सदर यात्रेने आज महाराष्ट्रात प्रवेश केला.
या यात्रेच्या माध्यमातून कॉंग्रेस पक्ष जनबंधन तयार करत आहे. कॉंग्रेस पार्टी ही पाच न्यायावर काम करत आहे. यात महिला सक्षमीकरण,शेतकर्यांना न्याय, युवकांना रोजगार, श्रमिकांना काम, आणि सामाजिक प्रश्नांचा यात समावेश आहे. महिला, युवा आणि श्रमिकांसाठी विशेष काम सुरु असून ही कोणा एका व्यक्तीची गॅरंेंटी नसून पक्षाची गॅरेंटी आहे.
कंेंद्र सरकारने गेल्या दहा वर्षात सुमारे १६ लाख कोटी रुपयांचे धनदांडग्या उद्योगपतींचे कर्ज माफ केले आहे. तत्कालीन मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस सरकारने शेतकर्यांचे ७२ हजार कोटीचे कर्ज माफ केले होते. परंतू शेतकर्यांचे कर्ज माफ करण्यास सध्याचे सरकार तयार नाही. सामाजिक जाती गणना झाली पाहिजे ही कॉंगे्रेसची मागणी आहे.
यावेळी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आ.ऍड.के.सी.पाडवी, आ.शिरीष नाईक, प्रतिभा शिंदे आदी उपस्थित होते