नंदुरबार l प्रतिनिधी
शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुराव्यातून महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानांतर्गत (जिल्हास्तर) सर्वसाधारण योजनेतून मंजूर झालेल्या इमाम बादशहा दर्गा कमान ते पश्चिमेस कब्रस्तान पर्यंत जाणाऱ्या १ किलोमीटर रस्त्यासाठी ६९ लाख १६ हजार ५१२ रुपयांच्या निधी मंजूर झाला असून, त्याचे भूमिपूजन करण्यात आले.
नंदुरबार शहरातील इमाम बादशहा दर्गा परिसरात मुस्लिम समाजाची स्मशानभूमी असून, त्या ठिकाणी अंत्यविधी करण्यासाठी जाणाऱ्यांना रस्त्या अभावी त्रास सहन करावा लागत असल्याची बाब मुस्लिम समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर रघुवंशी यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यानंतर महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानांतर्गत (जिल्हास्तर) सर्वसाधारण योजनेतून मंजूर झाला.
इमाम बादशहा दर्गा कमान ते पश्चिमेस कब्रस्तान पर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचे शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष परवेज खान, माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रमसिंह वळवी,माजी पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, माजी नगरसेवक फरीद मिस्तरी,फारुख मेमन, रियाज खाटीक,राजू इमानदार, मौलाना जकेरिया रहमानी, मौलाना हाफिस अब्दुल्ला, अब्दुल्ला पठाण, लियाकत पठाण, नजमुद्दीन शेख, जकाउल्ला इनामदार आदी उपस्थित होते.
मुस्लिम बांधवांना झाली सोय; माजी आ.चंद्रकांत रघुवंशी
मुस्लिम बांधव अंत्यसंस्कारसाठी कब्रस्तानमध्ये जात होते. त्यावेळेस त्यांना रस्त्या अभावी अनंत अडचणीच्या सामना करावा लागत होता. पावसाळ्यात तारेवरची कसरत करावी लागत होती.ही बाब लक्षात घेऊन शासनाशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला असता महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियानांतर्गत (जिल्हास्तर) सर्वसाधारण योजनेतून मंजूर झाला. कामाला लवकरच सुरुवात करण्यात असल्याची माहिती माजी आमदार रघुवंशी यांनी दिली.