नंदुरबार l प्रतिनिधी-
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गावांसाठी पानीफाउंडेशन मार्फत समृद्ध गाव स्पर्धा राबवली जात आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने दि.9 ऑक्टोंबर पासून नंदुरबार तालुक्यातील 28 गावांसाठी हसत खेळत एक दिवसीय प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र, कोळदा येथे आयोजित केले आहे.
समृद्ध गाव स्पर्धेचा पहीला टप्प्यात कोरोना परिस्थिती असतांनाही गावकऱ्यांनी ऑनलाईन प्रशिक्षण घेऊन अथक परिश्रम करीत स्पर्धेचा पहिला टप्पा पूर्ण केला या गावांचा सन्मान सोहळा ऑनलाईन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वृत्तवाहिन्यांवर मार्च मध्ये झाला होता. तसेच तालुकास्तरावर जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते नुकताच दि. 13 ऑगस्टला आसाने येथे या गावांचा सन्मान करण्यात आला. समृद्ध गाव स्पर्धेतील पुढील टप्प्याचे नियोजन करण्यासाठी धमाल मस्ती करीत ज्ञान देणाऱ्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणासाठी गावातील सरपंच, उपसरपंच, शेतकरी, जलमित्र, सामाजिक कार्याची आवड असणारे युवक, महिला बचत गट सदस्य, गावात काम करणारे सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी गावातून किमान 5 प्रशिक्षणार्थी उपस्थित राहितलं असे आवाहन तालुका प्रशासन व पानी फाउंडेशन कडून करण्यात आले आहे.
असे असेल नियोजन
बॅच क्र. -1
दि. 9 ऑक्टोंबर (शनिवार)- आसाने, न्याहली, जळखे, बह्याने, कार्ली, वावद, केसरपाडा, कोठली खु, कंढरे
बॅच क्र.-2
दि.10 ऑक्टोंबर (रविवार)- दहिंदुले बु., उमर्दे खु, धमडाई, बलदाने, रनाळे खु, बिलाडी, धामळोद, पातोंडा, धुळवद
बॅच क्र.-3
दि. 11 ऑक्टोंबर (सोमवार)- वाघाडे, अजेपुर, पावला, उमज, गुजरभवाली, अंबापुर, आडची, शिरवाडे लहान शहादा, करजकुपे.
बॅच क्र:- 4
दि.12 ऑक्टोबर (मंगळवार)- महिला बचत गटातील सदस्यांसाठी स्वतंत्र महिला बॅच.