Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बचत गटाच्या मध्यमातून ‘आपल्या गावात आपला रोजगार’ निर्माण करणार : डॉ. विजयकुमार गावित

team by team
March 10, 2024
in राजकीय
0
बचत गटाच्या मध्यमातून  ‘आपल्या गावात आपला रोजगार’ निर्माण करणार : डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार l प्रतिनिधी
प्रत्येक महिला बचत गटांना आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून दहा हजार रूपये दिले जात आहेत, आता गावातील महिलांनी त्यांचा रोजगार निवडायचा असून त्या रोजगारासाठी बचत गटांना प्रशिक्षण आणि निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे, त्यामुळे आपल्या गावात आपला रोजगार निवडण्याचे स्वातंत्र्य आदिवासी महिलांना मिळणार असल्याचे प्रतिपादन डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

ते आज तळोदा येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने आयोजित विविध वैयक्तिक व सामुहिक याोजनांच्या लाभा वितरण प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, आदिवासी सेवक डॉ. शशिकांत वाणी, रूपसिंग पाडवी, जितू महाराज, यशवंत ठाकरे,दिलीप ठाकरे यांच्यासह पंचक्रोशीतील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून घरकुले, वैयक्तिक व सामुहिक शेळी गट वाटप, महिलांना गायींचे वितरण तसेच गावातील तरूणाईमध्ये खेळ भावना निर्माण व्हावी यासाठी क्रकेट साहित्य व भजनी मंडळांना वाद्यावृंद व तद्अनुषंगिक साहित्य वितरित केले जात आहे. आदिवासी भागातील नागरिकांच्या समृद्धीसाठी जे उपक्रम व योजना राबवता येतील ते उपक्रम व योजना राबवण्यासाठी शासन कटीबद्ध आहे.

ते पुढे म्हणाले, प्रत्येक वाडा-पाड्याला जोडणारे जाडरस्ते बिरसा मुंडा योजनेच्या माध्यमातून जोडले जाणार आहेत. आश्रमशाळा, आरोग्य केंद्र, शाळा, ग्रामपंचायतींना या रस्त्यांच्या माध्यमातून जोडले जाणार आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घरात नळाच्या माध्यमातून पेयजल दिले जाणार असून आता शासकीय योजना जनतेच्या गरजेप्रमाणे राबवली जाणार आहे, त्यासाठी तुम्ही एखादा स्थानिक पातळीवर शेतीपुरक उद्योग विवडायचा आहे त्या उद्योगाला प्रोत्साहन आणि बाजारपेठ मिळवून देण्याचाही प्रयत्न येणाऱ्या काळात शासनानार्फत केला जाणार आहे.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सु्पिया गावित, खासदार डॉ. हिना गावित यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी वैयक्तिक शेळी प्रमाणपत्र वाटप- ६०, महिला बचत गट शेळी वाटप- ३१,
महिलांना गायींचे निवड प्रमाणपत्र-७१,क्रिकेट संच साहित्य- १०५, ६७ बचत गटांना प्रत्येकी रुपये १० हजार अर्थ सहाय्य,९० भजनी मंडळांना साहित्य वितरित करण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

माळीवाडा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विविध विकास कामांचे भूमिपूजन

Next Post

म्हसावद येथे घरफोडीत तीन लाखाचा मुद्देमाल लंपास

Next Post
म्हसावद येथे घरफोडीत तीन लाखाचा मुद्देमाल लंपास

म्हसावद येथे घरफोडीत तीन लाखाचा मुद्देमाल लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार  शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

August 8, 2026
भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

August 8, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

August 8, 2026
शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

August 7, 2026
धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

August 7, 2026
डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

August 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add