नंदुरबार l प्रतिनिधी
महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत शासकीय कृषि महाविद्यालय , नंदूरबार यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे ” सक्षम युवा समर्थ भारत ” या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय सेवा योजना विशेष सात दिवसीय निवासी श्रम संस्कार व समाज प्रबोधन शिबिर समारोप संपन्न झाला
श्रम शिबिराचे आयोजन पिंप्री ता. जि. नंदुरबार येथे आयोजित करण्यात आले.
या शिबिरादरम्यान स्वच्छता ,सामुहिक श्रमदान सोबतच ग्राम विकासातील युवकांचे तसेच कृषि शिक्षणाचे महत्व ,शेतकऱ्यांना शेतीशी निगडीत नविन तंत्रज्ञान व कृषि योजना विषयी माहिती ,जल व मृदू संधारण , मतदानाचे कर्तव्य या विषयी जनजागृती करण्यात आली तसेच स्वयंसेवकांनी विविध प्रकारच्या पथनाट्य द्वारे व्यसनमुक्ती , पाणी वाचवा , अंधश्रद्धा निर्मूलन , हुंडा बंदी , स्वच्छता अभियान , झाडांचे संवर्धन , आपत्ती व्यवस्थापन , मोबाईल व्यसन याबद्दल संदेश दिला
स्वयंसेवकांसाठी शिबिरा दरम्यान योगा व त्यांचा व्यक्तीमहत्व विकास घडवण्यासाठी विविध व्याख्याने आयोजित करण्यात आली , तसेच विद्यार्थ्यांनी गावामध्ये रॅली काढून मतदान सर्वे व फुले बळीराजा ॲप बद्दल माहिती दिली.
कार्यक्रम समारोपाचे प्रमुख पाहुणे कृषी विज्ञान केंद् कोळदे ता. नंदुरबार येथील प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ आर. एस. दहातोंडे होते तर अध्यक्ष स्थानी कृ. म. वि., नंदुरबार चे सहयोगी अधिष्ठाता डॉ यू बी होले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात एकात्मता नियोजन कसे करावे , अडचणींना सामोरे कसे जावे, वेळेचा अपव्यय कसा टाळावा , राष्ट्र -समाज प्रेम जोपासणे , आदर्श नागरीक म्हणून त्यांची कर्तव्य , हे गूण आत्मसात केलेले सांगितले व शिबिराचा चांगला अनुभव घेतल्याचं सांगितलं.
श्री. दहातोंडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की विद्यार्थी म्हणजे उत्साहाचे झरे आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते यशाची शिखरे गाठू शकतात, शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि शेतकरी हा पहिला शास्त्रज्ञ आहे. ते पुढे म्हणाले की राष्ट्रीय सेवा योजनातून विद्यार्थी घडतात व अशा शिबिरातूनच त्यांचा आत्मविश्वास वाढतो.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ यू बी होले यांनी विद्यार्थ्यांना जीवनात ध्येय ठरवण्यासाठी व यशात उतरवण्यासाठी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी तथा रासेयो, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस जी राजपूत यांनी केले तर सूत्रसंचालन स्वंयसेवक राणी दळवी व महेश गावंडे यांनी केली. यावेळी डॉ. पी.पी. गिरासे , जि. प शाळेचे मुख्याध्यापक सतिश देवरे , उपशिक्षक अशोक हेमाडे , ए पी खोंडे हे उपस्थित होते .