नंदुरबार l प्रतिनिधी
आजची स्त्री कुठल्याही क्षेत्रात मागे नाही. प्रत्येक क्षेत्रात तीने आपली कर्तबगारी दाखविली आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक असो किंवा क्रीडा क्षेत्र, प्रत्येक क्षेत्रात स्त्री आघाडीवर आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचाच हात असतो हेही विसरुन चालणार नाही. यापुढेही मुलांना घडवितांना प्रत्येक स्त्रीने आई जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहीजे, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्षा रत्नाताई चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. ते महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.
ट्रायबल स्पोर्टस ऍण्ड एज्युकेशन सोसायटी नंदुरबार आणि आबाजी स्पोर्ट्स क्लब नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त १८ कर्तबगार महिलांना माजी नगराध्यक्षा रत्नाताई चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते आई जिजाऊ स्त्री शक्ती सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नंदुरबार पालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी सभागृहात आयोजित कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून इंदिरा बँकेच्या अध्यक्षा कविताताई मनोज रघुवंशी, छत्रपती पुरस्कार प्राप्त संजय होळकर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक नयना देवरे, डॉ.सारिका पाटील, माजी महिला व बालकल्याण सभापती सोनिया राजपूत, ट्रायबल स्पोर्ट्स ऍण्ड एज्युकेशन सोसायटी नंदुरबार तथा आबाजी स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष डॉ.मयूर ठाकरे, उपाध्यक्ष जितेंद्र माळी, भागुराव जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते कर्तबगार महिलांना पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यात सुषमा शाह, नुतनवर्षा वळवी, प्रा.डॉ.शेख फिरदोस जमाल शफीउद्दीन, सिमा श्रीराम मोडक, आशा निवृत्ती बढे, दचंद्रकला कैलास माळी, स्मिता दीपक दिघे, मंगल कारभारी शिंदे (पाटील), अनिता बापुराव पाटील, माधुरी आबा बोरसे, कल्पना काशिनाथ पटेल, चेतना तुळशिराम चौधरी, दिपमाला दिलीप पाटील, सुरेखा जयराम पाटील, निंबाबाई रामा वाघमोडे, राजश्री रामसिंग गायकवाड, माधुरी भरत पाटील, जयश्री दिलीप पवार आदींचा पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील राज्य राष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य पटकावणार्या खेळाडूंनाही सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.गणेश पाटील तर आभार मनीष पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी करण चव्हाण, राजेश्वर चौधरी, मनीश सनेर, जगदीश वंजारी, भरत चौधरी, दिपेश माळी, योगेश माळी, राजेश माळी, प्रदीप माळी, प्रविण परदेशी, वर्षा ठाकरे आदींनी परिश्रम घेतले.