नंदुरबार l प्रतिनिधी-
तालुक्यातील रजाळे येथील ४२ वर्षीय युवा शेतकऱ्याचा आज शेतात काम करीत असताना सर्पदंश झाल्याने त्यांचा आज दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार तालुक्यातील रजाळे येथील रहिवाशी फकिरा सोनु पाटील यांचे जावाई गोरख पाटील रा. लहुगाव ह.मु. रजाळे ता.नंदुरबार हे आज दि.७ ऑक्टोंबर रोजी सकाळी शेतात कापुस वेचणीचे काम करीत असताना त्यांना सर्पदंश झाला. अधिक उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने उपचारापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे . या घटनेने रजाळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सर्वांशी मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व गोरख पाटील होते. त्यांच्या अचानक जाण्याने परिवारासह मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.