नंदुरबार l प्रतिनिधी
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत मतदार जागृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी SVEEP उपक्रमांतर्गत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन महिलांची बाईक रॅली तसेच मेहंदीस्पर्धा आयोजीत करण्यांत आली होती.
जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथुन बाईक रॅलीला सुरुवात झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्विप नोडल अधिकारी सावन कुमार आणि प्रांताधिकारी, नंदुरबार विनायक महामुनी यांनी नारळ फोडुन तसेच हिरवा झेंडा दाखवुन रॅलीचा शुभारंभ केला. जिल्हाधिकारी कार्यालयातुन निघालेली रॅली निवडणूकीशी संबंधीत घोषवाक्यांचे बॅनर वरील घोषणा देत नवापूर चौफुली- धुळे चौफुली-अंधारे चौक-नगरपालिका- नेहरु पुतळा- बस सटँण्ड- महाराणा प्रताप चौक या मार्गाने डॉ. काणे गर्ल्स हायस्कुल येथे पोहोचली. डॉ. काणे गर्ल्स हायस्कुलला बाईक रॅलीचा समारोप करण्यात आला.
रॅलीमध्ये नंदुरबार तालुक्याच्या सर्व शाळांच्या महिला शिक्षकांनी, विद्यार्थीनींनी तसेच लायन्स फेमिना क्लबच्या डॉ. तेजल चौधरी, सीमा मोडक, हिना रघुवंशी, रागिणी पाटील व अन्य महिला पदाधिका-यांनी उस्फुर्त सहभाग घेतल्याने रॅलीचा उत्साह पाहुन मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार तसेच प्रांत अधिकारी विनायक महामुनी यांनी देखील बाईक रॅलीत सहभाग घेऊन सुरुवातीपासुन शेवट पर्यंत बाईक चालविली.
बाईक रॅलीचा समारोप झाल्यानंतर डॉ. काणे गर्ल्स हायस्कुल येथे इ.5 वी ते 8 वीच्या विद्यार्थीनी, इ.9 वी ते 12 वीच्या विद्यार्थीनी तसेच महिला शिक्षीका व अन्य महिलांचा खुला गट अशा तीन गटांमध्ये मेहंदी स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेच्या सुरुवातीस प्रांत अधिकारी विनायक महामुनी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांनी आपल्या मनोगतातून महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन येणा-या निवडणूकी नंदुरबार विधानसभा क्षेत्रातून लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 साठी जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी शिक्षीकांची व विद्यार्थीनींची भूमिका महत्वपुर्ण असल्याचे विषद करुन सर्वानी आपापल्या कार्यक्षेत्रात मतदार जागृती करुन राष्ट्रीय कार्यास सहकार्य करण्याचे आवाहन करुन बाईक रॅली व मेहंदी स्पर्धेत स्वयंस्फुर्तीने सहभाग घेतल्याबद्दल सर्व उपस्थितांचे आभार मानले. माध्यमिक उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण यांनी मेहंदी स्पर्धेशी संबंधित माहिती व नियमावली स्पर्धकांना समजावून सांगून मेहंदी स्पर्धेस सुरुवात केली.
या स्पर्धेमध्ये भाग घेणा-या महिला स्पर्धकांना निवडणुकीशी संबंधीत बोधचिन्ह, शब्द, घोषवाक्य यांचे मेहंदीव्दारे हातावर रंगविण्यासाठी एक तासाचा वेळ देऊन स्पर्धा घेण्यांत आली. या मेहंदी स्पर्धेत 10 वर्षे वयाच्या विद्यार्थीनींपासुन ते सेवानिवृत्तीला आलेल्या शिक्षीकांपर्यंत सर्वानी स्वयंस्फुर्तीने सहभाग घेतला. सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना लायन्स फेमिना क्लबच्या वतीने अल्पोपहाराची व्यवस्था करण्यांत आली होती.
मेहंदी स्पर्धेचे परीक्षण चंद्रशेखर चौधरी व देवेंद्र कुलकर्णी यांनी केले. मेहंदी काढल्यानंतर शाळेच्या मैदानात उभारण्यात आलेल्या निवडणूकीच्या जनजागृतीचा संदेश देणा-या सेल्फी पॉईंटवर सर्व सहभागी महिलांनी व विद्यार्थीनींनी उत्स्फुर्त पणे सेल्फी घेतल्या.
बाईक रॅली व मेहंदी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उपशिक्षणाधिकारी युनूस पठाण, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, प्रशासन अधिकारी भावेश सोनवणे, प्राथमिक शिक्षण विभागाचे मनोज अहिरराव, डॉ.काणे गर्ल्स हायस्कुलच्या प्राचार्य सीमा मोडक, प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुलभा महिरे, क्रिडाशिक्षक जितेंद्र पगारे, पर्यवेक्षक मिलींद चव्हाण, नंदुरबार पंचायत समितीचे सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख सर्व शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, समग्र शिक्षा नंदुरबारचे कर्मचारी, पोलीस वाहतुक शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
मेहंदी स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या गटनिहाय स्पर्धकांची नावे खालीलप्रमाणे-
गट 1 – इ. 5 वी ते 8 वी
प्रथम क्रमांक (विभागुन)
भुमी शशिकांत सोनवणे
श्रॉफ हायस्कूल, नंदुरबार
पिरजादी मंताशा माहिम
ॲग्लो उर्दु हायस्कूल, नंदुरबार
व्दितीय क्रमांक (विभागुन)
सृष्टी शशिकांत कुंभार
डॉ.काणे गर्ल्स हायस्कुल, नंदुरबार
हफीका सैय्यद महेफुज अली
ॲग्लो उर्दु हायस्कूल, नंदुरबार
तृतीय क्रमांक (विभागुन)
सालेहा आबीद बागवान
ॲग्लो उर्दु हायस्कूल, नंदुरबार
उमेहानी रिजवान काझी
ॲग्लो उर्दु हायस्कूल, नंदुरबार
गट 2- इ. 9 वी ते 11 वी
प्रथम क्रमांक (विभागुन)
तनिष्का दिपक पाटील
श्रॉफ हायस्कूल, नंदुरबार
तनुश्री दिपक माळी
डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल, नंदुरबार
व्दितीय क्रमांक (विभागुन)
जान्हवी दर्यांवसिंग गिरासे
डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल, नंदुरबार
जुमा वाहीम कुरेशी
ॲग्लो उर्दु हायस्कूल, नंदुरबार
तृतीय क्रमांक (विभागुन)
हतीजा अल्ताफ शेख
ॲग्लो उर्दु हायस्कूल, नंदुरबार
पलक संजय पटेल
कमला नेहरु कन्या विद्यालय, नंदुरबार
गट 3- महिला शिक्षीका व अन्य महिलांचा खुला गट
प्रथम क्रमांक (विभागुन)
प्रतिभा साळुंखे
श्रॉफ हायस्कूल, नंदुरबार
रोहीणी अशोक राजपुत
डी.आर.हायस्कूल, नंदुरबार
माधुरी दिपक माळी
डी.आर.हायस्कूल, नंदुरबार
रेणूका बद्रीनाथ चव्हाण
जिल्हा परिषद शाळा, हरीपुर
रोहिणी गोकूळराव पाटील
जिल्हा परिषद शाळा, लोय
व्दितीय क्रमांक (विभागुन)
पुनम यशवंत पवार
प्रियदर्शनी विद्यालय, नंदुरबार
अमिना अन्सारी
नगरपालिका शाळा क्र.14
शुभांगी यादव पाटील
डॉ.काणे बाल विद्यामंदीर, नंदुरबार
रुबिना अहमदखान पठाण
ॲग्लो उर्दु हायस्कूल, नंदुरबार
तृतीय क्रमांक (विभागुन)
योगिता युवराज पाटील
के.डी.गावीत माध्यमिक विद्यालय आष्टे
वर्षा पाटील
जिल्हा परिषद शाळा, शितलपाडा
भाग्यश्री आनंदा मोरे
डॉ.काणे बाल विद्यामंदीर नंदुरबार
वैशाली पाटील
जिल्हा परिषद शाळा, अंबापूर
सपना सयाजीराव हिरे
जिल्हा परिषद शाळा, अंबापूर
सोनल निंबा बोरसे
जिल्हा परिषद शाळा, कोठली