नंदूरबार l प्रतिनिधी
महाविकास आघाडीकडून आ.आमश्या पाडवी यांना उमेदवारी द्या अशी मागणी शिवसेना उबाठा गटातर्फे करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणूक येत्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून वारे व्हायला लागले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात महा आघाडी मध्ये चुरस पाहायला मिळत आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघ नेहमी काँग्रेसच्या वाट्याला गेलेली आहे, परंतु आता महाविकास आघाडी मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने या लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे.
शिवसेनेला ही जागा सोडण्यात यावी अशी मागणी शिवसेना उबाठा गटाच्या वतीने पक्षश्रेष्ठी कडे करण्यात आली आहे.या मागणीचे निवेदन शिवसेना उपनेते रवींद्र मिरलेकर यांना देण्यात आले आहे. आ.आमश्या पाडवी हे महाविकास आघाडीचे योग्य उमेदवार आहेत. विधान परिषदेत त्यांनी आदिवासींच्या न्यायासाठी अनेक महत्त्वाचे प्रश्न मांडले आणि समाजाचा मोठा जनसंपर्क त्यांच्या बाजूने आहे.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच विधान परिषदेतून आमश्या पाडवी यांना उमेदवारी देऊन आदिवासी समाजाला न्याय मिळाला आहे. यांनी समाजासाठी अनेक काम केले असून जनता, तरुण तसेच आदिवासी समाजाच्या विविध संघटनांची मागणी आहे की, उमेदवारी शिवसेनेचे विधान परिषदेतील आ.आमश्या पाडवी यांना देण्यात यावी.
त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडे तशी मागणी केली असून पक्षश्रेष्ठींनी सकारात्मक निर्णय देण्यात येईल असे सांगितले आहे, अशी माहिती शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हा प्रमुख के. टी.गावित यांनी सांगितले. तालुका प्रमुख विजय ठाकरे, रोहन गावित, रमेश पाटील, अमृत ठाकरे, महादू गावित, अजय वळवी, तुकाराम गावित आदी उपस्थित होते.