Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मालमत्ता करावरील शास्तीची रक्कम माफ करावी: पालिकेचे माजी गटप्रमुख प्रा.मकरंद पाटील

team by team
March 7, 2024
in राजकीय
0
मालमत्ता करावरील शास्तीची रक्कम माफ करावी: पालिकेचे माजी गटप्रमुख प्रा.मकरंद पाटील

शहादा l प्रतिनिधी
पालिकेमार्फत मालमत्ता करावर आकारण्यात येणारी शास्तीची रक्कम माफ करण्यात यावी अशी मागणी पालिकेचे माजी गटप्रमुख,भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा शहादा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रा.मकरंद पाटील यांनी केली आहे.

शहादा नगरपालिका प्रशासक मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांना प्रा.मकरंद पाटील यांनी दिलेल्या पत्राचा आशय असा,नगरपालिका वसुली विभागाच्या वतीने शहरातील मालमत्ता धारकांना कर आकारणीवर शास्तीची रक्कम लावण्यात आली आहे.सदर रक्कम भरणे शहरातील मालमत्ता धारकांना आर्थिक अडचणीचे होणार आहे.

परिणामी नगरपालिकेच्या वसुलीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.या पत्राद्वारे सूचित करू इच्छितो की, महानगरपालिका अधिनियमानुसार जळगाव महानगरपालिकेने शास्तीची रक्कम माफ करण्यासाठी जाहीर आवाहन वजा जाहिरात एका दैनिकात  प्रकाशित केली आहे. त्यातील मजकूर असा:-महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम “अनुसूची ड” प्रकरण आठ “कराधान नियम” ५१ अन्वये आपल्या स्वेच्छा निर्णयानुसार कराधान नियम ४१ खालील शास्ती पूर्णतः किंवा अंशतः माफ करण्याचा अधिकार मा. आयुक्त यांना प्राप्त आहे. त्यानुसार मा. आयुक्त जळगांव शहर महानगरपालिका, जळगांव यांनी कराधान नियम ४१ अंतर्गत थकीत रकमेवरील आकारलेल्या शास्तीत सवलत देणेसाठी दि. ०८/०२/२०२४ ते दि.२९/०२/२०२४ या कालावधीत मालमत्ता करावरील अभय शास्ती योजना राबविलेली होती.या योजनेस नागरिकांनी दिलेला प्रतिसाद पाहता सदर योजनेचा कालावधी दि.०१/०३/२०२४ ते १५/०३/२०२४ पर्यंत वाढविण्यात येत आहे.

उपरोक्त जाहीर आवाहन तसेच शासन निर्णयाचा संदर्भ घेऊन आपणही शहादा नगर पालिका हद्दीतील मालमत्ता धारकांना आकारण्यात आलेल्या शिस्तीच्या रक्कमेतून अभय देत अधिकची रक्कम माफ करणेबाबत योग्य निर्णय घेण्याची अपेक्षा आहे.ज्यामुळे शहरातील मालमत्ता धारकांना कर भरणा करणे सोयीचे होईल.तसेच पालिकेच्या कर वसुलीतही यामुळे वाढ होऊन उत्पन्न वाढ होणार आहे.तरी शास्तीची रक्कम माफ करणेबाबत आपल्या स्तरावर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो.याबाबत मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांनी लवकर शहरवासीयांच्या हिताचा निर्णय घेण्याची अपेक्षा शहरातील मालमत्ता धारकांकडून व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

वैयक्तिक विकासाबरोबर सामुहिक विकासासाठी कटीबद्ध : डॉ. विजयकुमार गावित

Next Post

महाविकास आघाडीकडून आ.आमश्या पाडवी यांना उमेदवारी द्या : शिवसेना उबाठा गटाची मागणी

Next Post
महाविकास आघाडीकडून आ.आमश्या पाडवी यांना उमेदवारी द्या :  शिवसेना उबाठा गटाची मागणी

महाविकास आघाडीकडून आ.आमश्या पाडवी यांना उमेदवारी द्या : शिवसेना उबाठा गटाची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add