नंदुरबार l प्रतिनिधी
गण गण गणात बोते… गजानन महाराजांचा जयघोष करीत नंदनगरीत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शहरातील पाताळगंगा नदी किनारी असलेल्या पुरातन श्री गजानन महाराज मंदिरात प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या पालखी सोहळ्यात महिला पुरुष भाविकांनी सहभाग नोंदविला.
गजानन महाराज यांच्या आरती नंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.श्री. गजानन महाराज यांच्या 146 व्या प्रकट दिन उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला . त्यानिमित्ताने श्री. गजानन महाराजांचा रजत मुखवट्याची पालखी नंदुरबार शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली.
टाळ मृदुंग आणि पारंपारिक वाद्यातसह पालखी मिरवणुकीत महिला पुरुष भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पालखी मार्गावर अंगण स्वच्छ करून भाविकांनी रांगोळी द्वारे सुशोभित करण्यात आली होते.महिलांनी पालखी मार्गावर रांगोळी काढून अंगण सुशोभित केले.पालखी मिरवणुक गजानन महाराज मंदिर प्रारंभ होऊन पाताळगंगा नदी ते साक्री नाका,बाबा गणपती रोड, सोनार खुंट, गणपती मंदिर, मंगळ बाजार,असोदेकर किराणा दुकान मराठा मंगल कार्यालय, सिद्धि विनायक मंदिर,काका आणि दादा गणपती रोड, शिवाजी रोड, हिरालाल काका चौधरी यांचे घरावरून परत साक्री नाका मार्गे श्री गजानन महाराज मंदिरात पालखीचा समारोप करण्यात आला. दुपारी एक वाजेच्या सुमारास गजानन महाराज मंदिरात पुरोहितांच्या उपस्थितीत यजमानांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले.