Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पासपोर्ट केंद्रामुळे जिल्ह्याची ग्लोबल ओळख निर्माण होणार : डॉ.विजयकुमार गावित

team by team
March 4, 2024
in राजकीय
0
पासपोर्ट केंद्रामुळे जिल्ह्याची ग्लोबल ओळख निर्माण होणार : डॉ.विजयकुमार गावित

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात पासपोर्ट केंद्र सुरू झाल्याने या जिल्ह्याची ग्लोबल ओळख निर्माण होणार आहे. तसेच जिल्ह्यात स्वंतंत्र विमानतळ मंजूर व्हावे, यासाठी प्रयत्न करणार, असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

 

 

 

 

ते आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सुरू करण्यात आलेल्या डाकघर पासपोर्ट सेवा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, पासपोर्ट अधिकारी राजेंद्र गावंडे, धुळ्याचे विभागीय पोस्ट अधिक्षक पी.आर.सोनवणे, नंदुरबारचे पोस्ट मास्तर बी.एस. जोशी, सहाय्यक पोस्ट मास्तर व्हि.आर. चव्हाण, मनोज कुमार यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते.

 

 

 

 

यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, या जिल्ह्याच्या खासदार डॉ. हिना गावित निवडून आल्यापासून जिल्ह्यात वीज, आरोग्य केंद्र, वैद्यकीय महाविद्यालय, शिक्षण, राष्ट्रीय महामार्गांचे विस्तारीकरण, रेल्वे मार्ग आणि रेल्वे गाड्यांचे विस्तारीकरण, आकाशवाणी केंद्र, पासपोर्ट ऑफिस यासारख्या सुविधा पंतप्रधान मोदी यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. जे प्रश्न मांडले त्या प्रश्नावर तात्काळ तोडगा पंतप्रधान मोदी यांनी या जिल्ह्यासाठी दिला आहे. लवकरच उपसा जलसिंचन योजना, उकाई बॅकवॉटर च्या माध्यमातून जिल्ह्यात सिंचनाचे जाळे निर्माण होते आहे. वस्रोद्योग आणि शेतीपूरक व्यवसायांचे क्लस्टर जिल्ह्यात निर्माण होताहेत. रोजगारासाठी होणारे स्थलांतर या माध्यमातून थांबणार आहे. आता पासपोर्ट ऑफिसच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याची ग्लोबल ओळख निर्माण होणार असल्याचेही यावेळी मंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.

 

 

 

पासपोर्टसाठी अर्ज आणि बायोमॅट्रीक्स दोघेही एकाच छताखाली : डॉ. सुप्रिया गावित

आपल्या जिल्ह्यात ज्यावेळी पासपोर्ट सुविधा नव्हती तेव्हा आपल्या नागरिकांना अर्ज नाशिक येथे करावा लागत होता आणि बायोमॅट्रीक्स साठी ठाण्याला जावे लागत होते. परंतु आज सुरू झालेल्या या डाकघर पोस्टल सेवा केंद्रामुळे दोन्ही सुविधा ह्या स्थानिक पातळींवर नंदुरबारमध्येच उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असे यावेळी बोलताना जि.प.अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी सांगितले.

 

 

 

शिक्षण आणि नोकरीसाठी विदेश जाणाऱ्यांना दिलासा देणारे केंद्र : डॉ. हिना गावित

विविध संसदीय शिष्टमंडळांसोबत मला विदेश जाण्याची संधी मिळाली. मी ज्या देशांना भेटी दिल्या त्या प्रत्येक देशात नंदूरबारचे शिक्षण आणि नोकरीसाठी गेलेले नागरिक मला भेटतात. वेळेवर पासपोर्ट मिळावा यासाठी शिफारस मागण्यासाठीही नागरिक येत असतात. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात स्थानिक पातळीवर पासपोर्ट केंद्र असायला पाहिजे हे लक्षात आल्यानंतर त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू केला. उत्तर महाराष्ट्रात खानदेशात सर्वप्रथम पासपोर्ट केंद्र हे नंदुरबारचे मंजूर झाले आहे. या केंद्रात एकाच ठिकाणी अर्ज, डाक्युमेंट व्हेरीफिकेशन, बायोमॅट्रीक्स सारखी कामे होणार आहेत. त्यामुळे या आदिवासी बहुल जिल्ह्यातील शिक्षण आणि नोकरीसाठी विदेश जाणाऱ्यांना दिलासा देणारे केंद्र म्हणून या पासपोर्ट केंद्राकडे पाहायला हवे, असे प्रतिपादन यावेळी खासदार डॉ. हिना गावित यांनी मनोगत व्यक्त करताना केले.

 

 

 

यावेळी पोस्ट अधिकारी मनोज कुमार व पासपोर्ट अधिकारी राजेंद्र गावंडे यांनी प्रास्ताविक केले.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रकल्प सुरू करून गतवैभव प्राप्तीसाठी एकत्रित प्रयत्न करणार, शहादा येथे मान्यवरांची ग्वाही

Next Post

छोट्या उपसा सिंचन योजना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभदायक : डॉ. विजयकुमार गावित

Next Post
छोट्या उपसा सिंचन योजना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभदायक : डॉ. विजयकुमार गावित

छोट्या उपसा सिंचन योजना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभदायक : डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026
थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

February 12, 2026
जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास  मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

February 12, 2026
नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add