शहादा l प्रतिनिधी
लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सूतगिरणी संचालक मंडळ निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले आहे.
लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सूतगिरणीत स्व.अण्णासाहेब पी.के. पाटील यांच्या विचाराला सभासदांसह शेतकरी बांधवांनी साथ दिल्याने लोकशाही आघाडीने विजयाचा झेंडा रोवला आहे. या निवडणुकीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील यांच्या शेतकरी विकास पॅनलचा पराभव झाला आहे. निवडणूकीचा निकाल जाहीर होताच समर्थक कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.गुलालाची उधळण करीत फटाक्यांच्या आतिषबाजीने विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली.
या निवडणुकीसाठी लोकशाही पॅनल व शेतकरी विकास पॅनल यांच्यात सरळ लढत झाली. या लढतीत लोकशाही पॅनलने भरघोस मते प्राप्त करीत सूतगिरणीवर एक हाती सत्ता स्थापन केली आहे.रविवारी येथील लोकमान्य टिळक टाऊन हाॅल येथे सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष दिसून आला. लोकशाही आघाडीने सर्व जागांवर पहिल्या फेरीत आघाडी घेतली होती. सदर आघाडी कायम राहत लोकशाही पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले आहे. निकाल जाहीर होताच शहरातील खरेदी विक्री संघाजवळ लोकशाही पॅनल तर्फे जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी विजयी उमेदवारांची गुलाल उधळण करीत मिरवणूक काढण्यात आली. या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख अभिजीत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला तर लोकशाही पॅनलचे प्रमुख दीपकभाई पाटील व प्रा. मकरंद पाटील यांना विजय प्राप्त झाला आहे . निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वस्त्रोद्योग उपायुक्त दीपक खांडेकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गजानन पात्रे, घनश्याम बागल यांनी कामकाज पाहिले.
लोकशाही पॅनल -विजयी उमेदवारांना मिळालेली मते
पाटील दीपक पुरूषोत्तम-( विजय-४७),
पाटील हरिदास सदाशिव-( ३१२९ ),
पाटील वासुदेव सखाराम-(३२४८ )
पाटील वैकुंठ ईश्वर-(३१८४ ),
पाटील राजेंद्र लक्ष्मण-( ३२६७)
पाटील विलास उत्तम-( ३२३३),
पटेल लतिश ब्रिजलाल-(३१७० ),
पाटील मुरलीधर भूता-(३२२१ ),
चौधरी रमाकांत मगन-(३१९४ )
पाटील गणेश मणिलाल-(३१९० )
चौधरी अरविंद सुंदर-( ३२५८ )
पाटील गणेश मगन-( ३१७३)
चौधरी भगवान नरोत्तम-( ३२९०)
पाटील भगवान मोहन-(३२६८ )
पाटील शितलकुमार हितांशु (३२४१ )
चौधरी सुरेश सोमजी-( ३२०५)
पाटील मकरंद नगिन-( ३४०७)
पवार योगेश दरबारसिंग-(३५७० )
धनगर दिलीप चैत्राम-( ३६१५)
पटेल कल्पना काशिनाथ-(३५७९ )
पाटील शितलबेन विजय-(३३५७ )
शेतकरी विकास पॅनल -उमेदवारांना मिळालेली मते
पाटील अभिजीत मोतीलाल-(३०९६ )
चौधरी प्रवीण जगन्नाथ-( पराभूत २६६०)
पाटील हरी दत्तू-( २६६७)
पाटील सत्यानंद प्रकाश-( २७३४)
पाटील यशवंत नरसई-( २७२५)
पटेल अनिलभाई रमणभाई-(२७०८)
पाटील सुनील मथुर-( २६३३)
पाटील माधव गोविंद-( २७५३)
पाटील दिलीप तुंबा-(२७८० )
पाटील योगेश देविदास-( २७०८)
पाटील दिलीप बाबूलाल-( २७१४)
पाटील काशिनाथ सजन-(२७०९ )
पाटील नरोत्तम प्रकाश-(२७३८ )
पाटील दिलीप शंकर-( २७१५)
पाटील प्रकाश (कैलासभाई) ज्ञानेश्वर-(२६५८ )
पाटील यशवंत पुरुषोत्तम-(२७७६ )
पाटील अभिजीत मोतीलाल-(१७ )
पाटील ललिताबाई भानुदास-(२७३३ )
पाटील मीनाक्षीबेन गोपाळ-(२८५३ )
धनगर भटू दयाराम-(२८५७ )
पवार बाबुराव सरदारसिंग-( २८९८)
‘परिसराचे भाग्यविधाते स्वातंत्र्य सैनिक सहकार महर्षी अण्णासाहेब पी.के. पाटील यांच्या पथप्रदर्शनाने आपली वाटचाल सुरू आहे.
सभासदांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता आपल्यावर संपूर्ण विश्वास दाखविला. सूतगिरणी आणि साखर कारखान्याकडे शेतकरी बांधवांची रक्कम बाकी आहे. सर्वांची थकीत रक्कम आपण देणारच. कोणाचीही पैसे बुडवणार नाही. लोकनायक सूतगिरणीस ऊर्जितावस्था आणण्यासाठी प्राधान्याने कार्य करणार. परिसर विकासाचा साक्षीदार सातपुडा साखर कारखाना पूर्ण ताकदीने सुरू करण्यासाठी अंतिम श्वासापावतो प्रयत्नशील राहणार.’
– दीपकभाई पुरुषोत्तम पाटील,
पॅनल प्रमुख, लोकशाही आघाडी व अध्यक्ष, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ शहादा.
‘सद्यस्थितीत राज्यातीलच नव्हे तर देशातील सहकार क्षेत्र अडचणीत आहे. सातपुडा साखर कारखाना व लोकनायक जयप्रकाश सूतगिरणी हे दोन्ही प्रकल्प सद्यस्थितीत आर्थिक अडचणीत असल्याचे मान्य आहे. शेतकरी सभासदांचे देणे प्राधान्य क्रमाने देण्यास लोकशाही पॅनल प्रमुख दीपकभाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बांधील आहोत.परिसरातील जनतेने पुन्हा एकदा अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या पथप्रदर्शनाने चालणाऱ्या वारसांवर विश्वास दाखविला आहे.जनतेने आमच्यावर संपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. जनतेच्या विश्वासास तडा जाऊ देणार नाही. लोकशाही आघाडीच्या वतीने जनतेच्या व परिसराच्या विकासासाठी आपण अथक परिश्रम घेऊ.’
– प्रा.मकरंद पाटील,
चेअरमन, शहादा तालुका खरेदी विक्री संघ.
‘लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी शेतकरी सुतगिरणीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सभासदांनी दिलेला कौल मान्य आहे. नवनिर्वाचित संचालक मंडळाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. निवडणूक प्रक्रियेत ज्या कार्यकर्त्यांनी ,तरुण मित्रांनी, तसेच सभासद बंधू, भगिनी, जेष्ठ मार्गदर्शक यांनी सहकार्य केल्याबद्दल, मनापासून आभार.’
– अभिजित पाटील पॅनल प्रमुख, शेतकरी विकास पॅनल