नंदुरबार l प्रतिनिधी
सुजलॉन कंपनीने उद्ध्वस्त केलेल्या जमिनीवरील अवैध अतिक्रमण काढण्यासाठी 26 फेब्रुवारीपासून आदिवासी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण करण्यात येणार आहे.याबाबत निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, सुजलॉन व तिची उपकंपनी सर्जन रियालिटीज , सुजलॉन ग्लोबल सर्विस यांनी आदिवासींच्या 36 व 36 अ च्या जमिनीवर टाकलेले अवैध पौल, रस्ते, जनित्र काढून टाकावीत, या कंपनी व्यवस्थापनावर विनोद तंती, हितेश परमार, शरम सिंग, जनार्दन जगदाळे ,सुनील जोशी यांच्यावर आदिवासी शेतकऱ्यांची फसवणूक व अनुसूचित जाती जमाती कायदा नुसार गुन्हा दाखल व्हावा, जिल्हाधिकारी यांनी सुजलॉन कंपनीने बोगसदस्त करार नाम्याचे प्रामाणित करण्याचे दिलेले आदेशाची अंमलबजावणी व्हावी ,
5 फेब्रुवारी रोजी पुणे येथे झालेल्या बैठक व सामोचाराने चर्चा न करणाऱ्या सुजलॉन वर कायदेशीर कारवाई व्हावी, कंपनी व्यवस्थापनावर कोड 120/ ब ,420 ,34 व अनुसूचित जाती जमाती कायद्या नुसार गुन्हा दाखल व्हावा , राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडे वेळ न दवडता स्थानिक जिल्हा प्रशासनाने सुजलोन शेतकरी व समितीची तातडीने बैठक घ्यावी व तीढा सोडवावा अन्यथा सुजलोन कंपनीने उध्वस्त केलेल्या जमिनीवरील अवैध अतिक्रमण काढण्यासाठी आदिवासी शेतकरी 26 फेब्रुवारी पासून आमरण उपोषणास बसणार आहेत व या सर्वच जबाबदार सुजलॉन व तिची उप कंपनी राहील असे समितीकडून सांगण्यात आले.
याबाबत सदर मागणीचे निवेदन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांना देण्यात आले.यावेळी समितीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अरुण रामराजे, भिला भिल परबत पाडवी, वसंत भिल, अंबरसिंग ठाकरे, ज्ञानेश्वर भिल ,काशिनाथ भिल रोहिदास भिल,रजेसिंग सोनवणे यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.