नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हा महानगर प्रमुख संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले .
नंदुरबार शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळे जवळील व्यापारी संकुलनामध्ये कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. आगामी लोकसभा, विधानसभा व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी तसेच प्रचाराच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी, शिवसेनेचे उप महानगर प्रमुख इम्तियाज युनूस पटेल,शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अरुण चौधरी,सह संपर्क प्रमुख दीपक गवते, शिवसेनेचे युवा जिल्हाप्रमुख अर्जुन तात्या मराठे, युवती सेना राज्य सहसचिव मालती वळवी, शहर प्रमुख राजधर माळी, भक्तवत्सल सोनार ,छोटू चौधरी, संजय चौधरी, आणि पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.