शहादा l प्रतिनिधी
लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी शेतकरी सूतगिरणी संचालक मंडळ निवडणूकीसाठी लोकशाही पॅनलच्या वतीने नंदुरबार तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रचारफेरीस सभासद व शेतकरी बांधवांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी शेतकरी सूतगिरणी लि.उंटावद-होळ ता.शहादा संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुक प्रचारासाठी लोकशाही पॅनलच्या प्रचारानिमीत्त दि.15 रोजी नंदुरबार तालुक्यातील पाचोराबारी, कोठली, पिंपळोद,जांबोली, धुळवद ,आडछी, लोणखेडे, करजकुपा, नळवा, पळाशी, खोडसगाव, लहान शहादे, कोळदा आदि गावातील मतदार,सभासद व ग्रामस्थांना भेटून लोकशाही पॅनलला विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.सभासद व गावकऱ्यांनी प्रचारफेरीत सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी लोकशाही पॅनलचे प्रमुख नेते, लोकशाही पॅनलचे सर्व उमेदवार,समर्थकांसह विविध सहकारी संस्थांचे संचालक,पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रचारफेरी दरम्यान मतदार सभासदांसह ग्रामस्थ व शेतकरी बांधवांची घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करण्यात आली. तसेच लोकशाही पॅनलच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.