नंदुरबार l प्रतिनिधी-
5 मार्च पर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्र अंधारमय होईल असा इशारा वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेच्या शासनाला दिला.याबाबत निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यामध्ये महावितरण कंपनीतील नियमित रिक्त पदांच्या जागेवर गेले अनेक वर्ष कंत्राटी पद्धतीवर हजारो कामगार काम करत आहेत राज्यभर सुमारे हजारो वीज कंत्राटी कामगार त्यांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून वीज कंत्राटी कामगार आजपर्यंत मुख्यमंत्री ऊर्जामंत्री यांना अनेक वर्षात अनेक निवेदन सादर केलीत प्रत्यक्ष पत्रव्यवहार केला तसेच विविध प्रकारची आंदोलने मंत्रालय व आझाद मैदान तसेच वीज कंपनीच्या मुख्य कार्यालयासमोर केली.
मात्र त्याच्या शासनावर कोणताही परिणाम झाला नाही. राज्यातील महावितरण महापरीक्षण व महानिर्मिती कंपनीतील वर्षानुवर्षी नियमित विविध मंजूर रिक्त पदांच्या जागेवर कार्यरत असलेले सुमारे 42 हजार वीज कंत्राटी कामगारांच्या हितार्थ राज्यातील 30 प्रमुख वीज कंत्राटी कामगार संघटना एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कामगार संघटना संयुक्त कृती समिती स्थापन केली आहे .प्रमुख मागण्यांमध्ये कंत्राटी कामगार पद्धत कायमस्वरूपी बंद करून सात वर्ष शाश्वत रोजगार उपलब्ध करून द्यावा,
नियमित विविध मंजूर रिक्त पदांच्या जागेवर वीज कंत्राटी कामगारांना रोजगार देऊन शासन सेवेत सामावून घ्यावे, 30 टक्के पूर्वक भत्ता मिळावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. यासाठी विविध संघटनांचे सुमारे 42 हजार वीज कंत्राटी कामगार हे राज्यभरात आंदोलन करीत आहेत . जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले , 16 फेब्रुवारी रोजी कामगार आयुक्त यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे, 21 फेब्रुवारी रोजी विभागीय कार्यालय येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
28 व 29 फेब्रुवारी रोजी काम बंद आंदोलन करण्यात येणार असून तोपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही तर पाच तारखेपासून संपूर्ण राज्यातील 30 संघटनातील 42 हजार कर्मचारी हे बेमुदत उपोषणास बसतील यामुळे संपूर्ण महाराष्ट्र अंधारमय होईल व यास सर्वस्व जबाबदारी शासनाची राहील असे केंद्रीय अध्यक्ष. महाराष्ट्र बाह्यस्त्रोत विज कंत्राटी कामगार संघटना (इंटक) केंद्रीय अध्यक्ष दीपक ओतारी यांनी सांगितले सदर मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आले.
यावेळी करीम खाटीक जळगांव झोन अध्यक्ष,जळगांव झोन सरचिटणीस,संदिप धनगर,नंदुरबार सर्कल अध्यक्ष खुशाल जाधव,नंदुरबार सर्कल सरचिटणीस प्रल्हाद कोळी
नंदुरबार सर्कल उपाध्यक्ष भरत पाटील,नंदुरबार सर्कल खजिनदार दिनेश सामुद्रे, नंदुरबार सर्कल उपसरचिटणीस गणेश साळी आदी उपस्थित होते.