नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुका विधायक समिती व इंदिरा महिला सहकारी बँकेच्या माजी चेअरमन कै.विमलताई भटेसिंह रघुवंशी यांच्या चौथ्या पुण्यतिथी निमित्त जी.टी. पाटील महाविद्यालयाच्या परिसरातील स्मृतीस्थळावर अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी स्मृतीस्थळावर रघुवंशी परिवाराच्या वतीने संस्थेचे व्हा.चेअरमन, उद्योगपती मनोज रघुवंशी यांनी पुष्पा अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी, इंदिरा महिला सहकारी बँकेच्या चेअरमन कविता रघुवंशी,माजी नगरसेवक किरण रघुवंशी ,माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी, मेघा रघुवंशी, कल्याणी रघुवंशी, थिया रघुवंशी, पृथ्वीसिंह रघुवंशी,माजी पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील,माजी नगरसेवक रवींद्र पवार,
माजी नगरसेवक दीपक दिघे, सामाजिक कार्यकर्ते मनोहर पाटील, संस्थेचे समन्वयक डॉ.एम एस रघुवंशी, प्राचार्य डॉ.एम.जे रघुवंशी, विधायक समितीचे मुख्य कार्यालयाचे अधीक्षक प्राचार्य पुष्पेन्द्र रघुवंशी,प्राचार्य डॉ.एन.डी चौधरी ,उपप्राचार्य एन.जे. सोमानी यांच्यासह संस्थेचे विविध शाखांचे प्राध्यापक ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.