म्हसावद । प्रतिनिधी:
म्हसावद पोलीसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई करीत तीन लाखाचा गुटखा पकडला आहे.
म्हसावद पोलीस ठाणे हद्दीत खेडदिगर येथील बॉर्डर नाकाबंदी येथे पोलिस निरीक्षक राजन मोरे,उपनिरीक्षक जितेंद्र पाटील,बहादूर भिलाला, दादाभाई साबळे, शैलेश राजपूत, पुरुषोत्तम सोनार, विकास कापुरे, उमेश पावरा, मोहन साळवे,काशिनाथ साळवे,कलीम रावताडे, हे कारवाई करीत असताना पिकअप वाहन ( क्र. MH -39-C-6575 ) चा चालक हा आपल्या ताब्यातील वाहनात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल गुटका घेऊन जात असल्याची गोपनीय खात्रीलायक माहिती म्हसावद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजन मोरे यांना मिळाल्याने.
सदर वाहनाचा दोन टीम करून स्टाफ सह पाठलाग करून दरा-गावाजवळ उनपदेव फाट्याजवळ त्यास पकडण्यात आले असता त्याच्या ताब्यातील वाहनात तीन लाख रू.किंमतीचा विमल गुटखा व सुगंधित पान मसाला तंबाखू व साडेतीन लाख रू.किमतीचे पिकअप वाहन असे एकूण साडे सहा लाख ₹ किमतीचा माल पकडण्यात आला.
याप्रकरणी आकाश दिलीप ढोले,रा.वडफळ्या ता.धडगाव याच्याविरुद्ध भादवि कलम 328,188,272,273 सह अन्नसुरक्षा मानदे अधिनियम 2006 चे कलम 26(2)(4),30(2)(A)., कलम 239/177 मो. वा. कायदा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास निरीक्षक राजन मोरे यांवह्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जितेंद्र पाटील
हे करीत आहेत.