शहादा l प्रतिनिधी
लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी शेतकरी सूतगिरणी संचालक मंडळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकशाही पॅनलला विजयी करावे असे आवाहन ज्येष्ठ नेते व पदाधिकारी यांनी तालुक्यातील विविध गावांना प्रचारार्थ दिलेल्या भेटीत केले आले.
‘घेऊन वारसा अण्णासाहेबांचा,चालवू वसा शेतकरी सेवेचा’ हे घोषवाक्य घेऊन लोकशाही पॅनलला निवडून देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.प्रचाराचा शुभारंभ उंटावद येथील रोकडमल हनुमान मंदिर व लोकनायक सूतगिरणीच्या गणपती मंदिरात परिसराचे नेते सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, शहादा पंचायत समितीचे माजी सभापती माधवकाका पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील,दूध संघाचे माजी चेअरमन उध्दव रामदास पाटील, माजी नगरसेवक के.डी.पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रा.मकरंद पाटील,मोहनभाई पाटील, विजय पाटील,राजाराम पाटील,जगदीश पाटील, अनिल भामरे,जयप्रकाश पाटील, रमाकांत पाटील,आदि मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ फोडून करण्यात आले.लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी शेतकरी सूतगिरणी लि.उंटावद-होळ ता.शहादा संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारासाठी लोकशाही पॅनलच्या प्रचारानिमीत्त
शहादा तालुक्यातील उंटावद,होळ, तिखोरा,अलखेड व पाडळदा येथील मतदार-सभासद व ग्रामस्थांना भेटून लोकशाही पॅनलला छत्री या निशाणीवर फुलीचा शिक्का मारून विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी उमेदवार व समर्थकांसह विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.