नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील देसाईपुरा महात्मा बसवेश्वर नगर परिसरातील काका गणपती मंडळातर्फे आज मंगळवार दि.13 फेब्रुवारी रोजी गणेश जयंती निमित्त सकाळी 11 ते 2 दरम्यान महाआरती तसेच महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल.
पंचधातूची श्री गणरायांची विलोभनीय मूर्ती रथात कायमस्वरूपी विराजमान करण्यात आली आहे. श्रींचे दर्शन आणि प्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री काका गणपती मंडळातर्फे करण्यात आले आहे