नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील पाताळ गंगा नदीकिनारी असलेल्या पुरातन निळकंठेश्वर महादेव मंदिरा जवळील श्री गजानन महाराज मंदिरात वसंत पंचमीनिमित्त विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गजानन महाराज मंदिराचे यंदा 50 वे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे.
आज मंगळवार दि.13 फेब्रुवारी रोजी ब्रह्मवृंद पुरोहितांच्या उपस्थितीत श्री गणेश याग आणि होम हवन होईल. उद्या बुधवार दि.14 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजे पासून दुपारी चार वाजेपर्यंत श्री गजानन महाराज मंदिर प्रांगणात परंपरेनुसार पिठलं भाकर, मसाले भात मेनूचा महाप्रसाद (भंडारा) वाटप करण्यात येईल. गेल्या 50 वर्षापासून सलग परंपरा सुरू आहे.
गजानन महाराज मंदिरावर येण्या साठी साक्री नाक्यापासून पुलाच्या डाव्या बाजूने सरळ तसेच मिराज सिनेमाच्यामागील रस्त्याने स्वामीनारायण मंदिरासमोर जाता येईल. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन सद्गुरु सेवा संस्थानचे अध्यक्ष हिरालाल काका चौधरी आणि संचालक मंडळ यांनी केले आहे.