नंदुरबार l प्रतिनिधी-
सामाजिक स्वास्थ्यासाठी योगसाधनेशिवाय पर्याय नाही, राज्यात योग साधनेच्या जनजागृती करीता योग शिक्षक संघ कार्यरत आहे. राज्यात महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ मनोज निलपवार यांच्या प्रेरणेने राज्यातील जिल्ह्यासह तालुक्यात उत्कृष्ट योग साधनेचे कार्य प्रगतीपथावर आहे.
नंदुरबार शहरातील योग शिक्षक प्राचार्य डॉ. संजय शिंदे यांची महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे नंदुरबार जिल्हा अध्यक्षपदी महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ मनोज निलपवार व महासचिव अमित मिश्रा यांनी नुकतीच नियुक्ती पत्र देऊन केली आहे.
डॉ. संजय शिंदे योगशास्त्र विषयात उच्चशिक्षित असून शास्त्रोक्त पद्धतीने योगाभ्यास, योग-अध्यात्म-आयुर्वेद, योगसंस्कृती आणि संस्कार प्रसाराचे कार्य गेल्या अनेक वर्षापासून करीत आहेत.
त्यांची नंदुरबार जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल जिजामाता शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई मोरे, उपाध्यक्ष डॉ. विक्रांत मोरे, सचिव डॉ. अभिजीत मोरे, प्राचार्य डॉ. सतीश देवरे, प्राचार्य डॉ रविंद्र पाटील, महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे जनसंपर्क अधिकारी कृणाल महाजन, उत्तम अहिरे, उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख, राज्य कोषाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, शरदजी बजाज सचिव योग फांउडेशन महाराष्ट्र, राज्य मिडिया प्रभारी प्रभाकर कोळसे, शांताराम पाटील राज्य सचिव, नाशिक आदीयोग महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुलभा गवळी, आशीर्वाद योग महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मीनल शिंपी, शिरपूर योग विद्याधाम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाडीले, धुळे योग विद्याधामचे डॉ. जितेंद्र भामरे, पिंपळनेर योग विद्याधामचे डॉ. योगेश नांद्रे, आहारतज्ञ डॉ स्नेहल पंजराळे, योग शिक्षक एन.डी. माळी, वसंत पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.