नंदुरबार l प्रतिनिधी-
सुरतहून आयोध्येकडे जाणाऱ्या आस्था एक्सप्रेसवर नंदुरबार रेल्वे स्थानकाजवळ रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास दगडफेकीची घटनेनंतर काही प्रवाश्यांनी तक्रारी केल्या होत्या. यानंतर आरपीएफ नी तपासणी केली असता कुठेही दगडफेकीचे निशान आढळून आलेले नाही. यानंतर रेल्वे प्रशासनाने रात्रीच संबंधीत ट्रेनही आयोध्येकडे रवाणा केली होती.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार,काल दि.11 फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास सुरतहून आयोध्येकडे जाणाऱ्या आस्था एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची तक्रार प्रवाशांनी केली होती. नंदुरबार रेल्वे स्थानकापासून जवळपास एककिलोमीटर आतच्या परिससरात ज्याठिकाणी दगडफेकीच्या तक्रारी पोलीसांनी प्राप्त झाल्या होत्या. त्या परिसरात पोलीसांनी लागलीच झाडाझडती घेतली. याठिकाणी पोलांसांनी झाडाझुडपात झोपलेले दोन इसम आढळून आले आहे. यातील एक नांदेडचा रहिवासी असून तो मद्यपी असल्याने याठिकाणी झोपला होता. तर दुसरा हा मनोरुग्ण असून त्याला रेल्वे पोलीसांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने एका पोलीस कर्मचाऱ्यावर झडप देखील घातली. त्याला तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात निले असता त्याला तिथे मनोरुग्ण विभागात दाखल करुन घेण्यात आले आहे.
या मनोरुग्णाची पोलीसांनी चौकशी केली असता त्याकडून कुठलीही माहीती मिळालेली नाही. आरपीएफ ने या घटनेप्रकरणी अज्ञाता विरोधात तक्रार नोंदवून घेतली आहे.
अशा पद्धतीने दगडफेक झालीच नसल्याचा दावा पोलीसांकडून केल्या जात आहे. मात्र घटनेनंतर नंदुरबार पोलीसांच्या उपविभागीय अधिकारी संजय महाजन शहर पोलीस स्टेशनचे राहुल पवार यांनी रेल्वे स्थानकात जावून संपुर्ण घटनेचा आढावा देखील घेतला आहे.