Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उपजत क्रीडाक्षमतांना मार्गदर्शन, प्रशिक्षण लाभले, तर आदिवासी क्रीडापटूही देशस्तरावर चमकतील: खा. डॉ. हिना गावित

team by team
December 2, 2023
in राजकीय
0
उपजत क्रीडाक्षमतांना मार्गदर्शन, प्रशिक्षण लाभले, तर आदिवासी क्रीडापटूही देशस्तरावर चमकतील: खा. डॉ. हिना गावित

नंदुरबार l प्रतिनिधी

 

मैदानी असो अथवा बैठे कोणतेही क्रीडा प्रकार असो, खेळलेच पाहिजे. शालेय जीवनापासून खेळण्यात सहभागी होत राहिलो तर आपल्या प्रत्येकातील खेळाडू वृत्ती वाढत जाते. कधी जिंकणे कधी हारणे स्वीकारत राहिल्याने जीवनातील नकारात्मकता घालवायला मदत होते; अशा शब्दात मार्गदर्शन करतानाच संसद रत्न खासदार डॉक्टर हिना गावित यांनी आदिवासी क्रीडापटूंना केंद्र आणि राज्य सरकारने जास्तीत जास्त सहकार्य आणि मदत देणाऱ्या उपाययोजना आणल्या असून आपल्या भागातील जास्तीत जास्त खेळाडू पुढे कसे येतील यासाठी प्रयत्न होणे अधिक आवश्यक असल्याचे सांगितले.

 

 

 

 

नंदुरबार जिल्हा आदिवासी एकात्मिक प्रकल्प आयोजित प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन सोहळ्यात संसद रत्न खासदार डॉक्टर हिना गावित बोलत होत्या. जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर या स्पर्धा भरविण्यात आल्या असून 1 डिसेंबर 2023 ते 3 डिसेंबर 2023 पर्यंत या स्पर्धा चालणार आहेत. शहादा नंदुरबार आणि नवापूर या तीन तालुक्यातून एकूण 1446 खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित व संसद रत्न खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते पार पडलेल्या या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषदेच्या सभापती संगीताताई गावित, ॲड.जयश्री वळवी, प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी संजय काकडे, जीजा पाडवी, किरण मोरे, निर्मल माळी, प्रकाश वसावे व अन्य यांच्यासह सर्व शिक्षण विस्तार अधिकारीअधिकारी, सर्व कार्यालयीन कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शासकीय प्रशिक्षक उपस्थित होते.

 

 

 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित व खा.डॉ. हिना गावित यांच्या हस्ते हस्ते मशाली द्वारे क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली तसेच हवेत रंगीबेरंगी फुगे सोडण्यात आले.

यावेळी खा.डॉ. हिना गावित यांनी पुढे सांगितले की आदिवासी मुला-मुलींना दैवी देणगी लाभलेली असते आणि त्यामुळेच त्यांच्यामध्ये क्रीडा प्रकारासाठी आवश्यक असलेल्या सर्व क्षमता निसर्गतः उपलब्ध असतात त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले आणि प्रशिक्षण मिळाले तर देश पातळीवरील चांगले खेळाडू आपल्या भागातून घडू शकतात या पार्श्वभूमीवर प्रकल्प कार्यालयाने सुरू केलेल्या स्पर्धा नक्कीच महत्त्वपूर्ण आहेत; असे खासदा गावित म्हणाल्या.

 

 

 

 

जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सुप्रिया गावित यांनी आपल्या भाषणात सांगितले की आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित हे स्वतः चांगले खेळाडू होते.त्याचप्रमाणे खासदार डॉक्टर हिना ताई स्वतः चांगल्या क्रीडापटू होत्या त्यामुळे क्रीडा क्षेत्रातील अडीअडचणींचा त्यांना चांगला अभ्यास आहे आणि त्यामुळेच मंत्री डॉक्टर गावित यांनी अन्य सर्व क्षेत्रातील विकासाप्रमाणेच क्रीडा क्षेत्राचा देखील व्यापक विकास घडवला आहे चांगल्या क्रीडापटूंना चांगले प्रशिक्षक मिळवून देण्याचे श्रेय मंत्री डॉक्टर गावित यांचेच आहे केंद्र आणि राज्य सरकारकडून क्रीडापटूंसाठी लागू असलेल्या योजनांची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने केली जाईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी माहिती देतानाच डॉक्टर सुप्रिया गावित म्हणाले की प्रत्येक खेळाडूला आत्मविश्वास महत्त्वाचा आहे आत्मविश्वास असेल तर तो जिंकण्याच्या शक्यतेच्या जवळ पोहोचतो प्रकल्प कार्यालयाने त्या पद्धतीचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन सातत्याने कसे उपलब्ध होईल याकडे लक्ष द्यावे असे डॉक्टर सुप्रिया गावित म्हणाल्या.

 

 

 

 

 

उद्घाटनानंतर सर्व प्रमुख मान्यवरांनी प्रत्यक्ष मैदानात जाऊन धावपटूंना सिग्नल देऊन क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ केला. ई माइंड्स्पार्क कक्षात भेट देऊन संगणकावर कार्यरत विद्यार्थ्यांशी मान्यवरांनी संवाद साधला.

बातमी शेअर करा
Previous Post

आदिवासी भागातील विकास कामांना स्थगिती देण्याचे पाप महायुती सरकारचे :माजी मंत्री ॲड.के. सी.पाडवी

Next Post

ब्रेकिंग न्यूज: अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबटचा जागीच मृत्यू

Next Post
ब्रेकिंग न्यूज: अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबटचा जागीच मृत्यू

ब्रेकिंग न्यूज: अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबटचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना  रद्द, ६ निलंबित

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना रद्द, ६ निलंबित

April 1, 2026
होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

April 1, 2026
भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

April 1, 2026
नेदरलँड्समध्ये पोस्टडॉक्टोरल अभ्यासासाठी डॉ. ज्ञानेश्वर राऊत यांची निवड

नेदरलँड्समध्ये पोस्टडॉक्टोरल अभ्यासासाठी डॉ. ज्ञानेश्वर राऊत यांची निवड

April 1, 2026
नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

April 1, 2026
तीन प्रमुख चौक उजळले; आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे लोकार्पण

तीन प्रमुख चौक उजळले; आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे लोकार्पण

April 1, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add