Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

निवडणुकीच्या कालावधीत पोलिसांनी जप्त केल्या 20 तलवारी एकास अटक

team by team
October 4, 2021
in क्राईम
0
निवडणुकीच्या कालावधीत पोलिसांनी जप्त केल्या 20 तलवारी एकास अटक
नंदूरबार l प्रतिनिधी
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती पोट निवडणुक  व नवरात्रौत्सव दरम्यान समाजकंटकांवर गुन्हेगारांवर अंकुश राहावा यासाठी पोलीस दलातर्फे उपाययोजना करण्यात येत आहेत.धडगाव येथून एकाच्या ताब्यातून 1 लाख 28 हजार रुपये किमंतीची 20 लहान मोठ्या धारदार तलवारी जप्त केल्या.याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती पोट निवडणुक 2021 व नवरात्रौत्सव दरम्यान समाजकंटकांवर गुन्हेगारांवर अंकुश राहावा तसेच निवडणूका व सण उत्सव भयमुक्त वातावरणात पार पाडावेत यासाठी खबरदार म्हणून  पोलीस उप महानिरीक्षक , नाशिक परिक्षेत्र , नाशिक यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती पोर निवडणुकीच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा भेटी दरम्यान अवैध शस्त्रांवर कारवाई करण्याच्या सुचना दिलेल्या होत्या तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक  पी . आर . पाटील यांनी देखील स्थानिक गुन्हे शाखेला अवैध शस्त्रांव कारवाई करणेबाबतचे आदेश दिले होते . त्या अनुषंगाने दि. 4 ऑक्टोंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  रविंद्र कळमकर यांन गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की , धडगाव गावात मुख्य रस्त्यावर एक इसम हा त्याच्या शेती औजा विक्रीच्या दुकानात मानवी जिवितास घातक असलेल्या लोखंडी बनावटीच्या तलवारी बेकायदेशीररीत्या कब्जात बाळगुन आहे अशी बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करुन त्यांना तात्काळ धडगांव येथे जावुन खात्री करुन पुढील कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडगाव येथे जावुन खात्री केली असता धडगाव गावातील मुख्य रस्त्यावर एव इसम पत्र्याच्या टपरी बाहेर संशयास्पद हालचाली करतांना दिसुन आला म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास ताब्यात  घेतले.त्याच्या मालकीच्या टपरीची झडती घेतली असता तिथे 1 लाख 28 हजार रुपये किमंतीची 20 लहान मोठ्या धारदार तलवारी मिळुन आल्या. याप्रकरणी संजय कागडा वळवी  रा . कात्री ता . धडगाव याच्या विरुद पोलीस ठाण्याला भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . सदर कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झालेले असुन भविष्यात कोणी अवैध शस्त्र जवळ बाळगल्यास त्यांची गय केली जाणार नाही , असा नंदुरबार जिल्ह पोलीसांकडुन इशारा दिलेला आहे . सदरची कारवाई पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलीस अधीक्षक  विजय पवार , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , सहा . पोलीस निरीक्षक  संदीप पाटील पोलीस हवालदार विनोद जाधव , पोलीस नाईक जितेंद्र अहिरराव , पोलीस अमंलदार अभिमन्यु गावी दिपक न्हावी , रमेश साळुंके यांनी केली आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या कार्यक्षेत्रात मद्यविक्रीस बंदी

Next Post

जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या मतदान व मतमोजणीच्या 200 मीटर परिसरात प्रवेशास बंदी

Next Post

जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या मतदान व मतमोजणीच्या 200 मीटर परिसरात प्रवेशास बंदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add