नंदुरबार l प्रतिनिधी
शिवसेना (ठाकरे गट), भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (पवार गट), संभाजी ब्रिगेड, आर पी जाय, भीम आर्मी व घटक पक्षांनी महाविकास आघाडी तर्फे शेतकन्यांच्या विविध मागण्या संदर्भात शासनाच्या विरोधात भीक मांगी आंदोलन करण्यात आले.
नंदुरबार शहरातील नेहरू पुतळा परिसरात महाविकास आघाडीतर्फे जिल्ह्यात दुष्काळ निधी तसेच शेतक-यांच्या विविध मागण्यांसंदर्भात शासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शिवसेनेचे महानगर प्रमुख पंडित माळी, तालुका अध्यक्ष विजय ठाकरे, युवती सेनेच्या मालती वळवी, उपमहानगर प्रमुख इम्तियाज कसई, कॉंग्रेस पक्षाचे राजेंद्र पाटील, रवी कोठारी, दिलावर शहा, खंडेराव पवार, इक्बाल खाटीक, स्वयंरोजगार सेलचे जिल्हाध्यक्ष मोतीलाल ठाकूर शहराध्यक्ष रऊफ शहा, की. जार, खान, शकील पठाण, सलाम भाया,
युवक काँग्रेसचे पंडीत तडवी, दत्तू पवार राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष पवार गट नितीन जगताप, केसरसिंग क्षत्रीय, बाळासाहेब मोरे,शहराध्यक्ष जितेंद्र मराठे, तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील, युवक शहराध्यक्ष मिलिंन जाधव, युवक जिल्हा चिटणीस सागर पाटील,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सम्राट बिन्हाडे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र पाटील. भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष संजय रगडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








