नंदुरबार l प्रतिनिधी
मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंदोलन पुकारलेले आहे. त्यानिमित्त ते महाराष्ट्रभर दौरा करुन सभा घेत आहेत. त्यांची नंदुरबार येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांची विराटसभा यशस्वी करण्यासाठी नंदुरबार जिल्हा सकल मराठा समाजातर्फे रविवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
२६ नोव्हेंबर रविवार दुपारी ठीक ४ वाजता नंदुरबार तालुक्यातील उमर्दे येथील विठ्ठल मंदिर परिसरात बैठक होईल. यावेळी विविध विषयांवर चर्चा होईल. त्यात आपला गाव व परीसरात सभेची माहिती व सभेला संपुर्ण कुटुंबाची उपस्थिती बाबत घराघरात महत्व पटवुन सांगणे.
गावातून समाज बांधव, भगिनी यांना सभास्थळी जाण्याकरीता योगदान देणार्या गाड्यांची क्रुझर, पिकअप, ट्रॅक्टर इ. वाहनांबाबत नियोजन. आपल्या गावातील शिस्तप्रिय स्वयंसेवकांबाबत नियोजन. (नाव, पत्ता, मोबाईल नंबर व पासपोर्ट फोटो यासह), नियोजनाकरीता आवश्यक तरतुदीकरीता स्वःइच्छेने योगदान देणार्यांची यादी तयार करणे अशा आदी विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. आयोजन बैठकीस जास्तीत जास्त मराठा समाज बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सकल मराठा समाज नंदुरबार जिल्हाच्यावतीने करण्यात आले आहे.








