नंदुरबार l प्रतिनिधी
विकसित भारत संकल्प यात्रेसंदर्भात तळोदा तालुक्यातील करडे व तुळाजा येथे केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे हे आज शुक्रवार, २४ रोजी येत आहे. ते नंदूरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत आढावा घेणार आहेत.
केंद्रीय मंत्री नारायण राणे सकाळी पावणेअकरा वाजता नंदुरबारात येणार असून लागलीच ते जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार आहेत. त्यानंतर दुपारी ते तळोदा तालुक्यातील दोन्ही गावांना भेटी देणार आहेत. करडे व तुळाजा येथे ते भेट देणार असल्याने जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहुल गावडे, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, विस्तार अधिकारी बी. डी. मोहिते, संजय पाटील, गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर यांच्यासह ग्रामसेवक प्रवीण खाडे व प्रकाश कोळी यांनी गुरुवारी करडे व तुळाजा गाठत कार्यक्रम स्थळाची पाहणी केली.
ऐनवेळी ठरलेल्या दौऱ्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाल्याचे दिसून आले. या दौऱ्याच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी होणार आहेत.








