शहादा l प्रतिनिधी
प्राचार्य मेहमूद गुलाब खाटीक,अॅग्लो कनिष्ठ शिक्षणशास्त्र महाविद्यालय, नंदुरबार यांना महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचा ‘तात्यासाहेब जोतिराव फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक समता पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेमार्फत दि.28 नोव्हेंबर या दिवशी तात्यासाहेब जोतिराव फुले स्मृती दिवस प्रीत्यर्थ दरवर्षी ‘तात्यासाहेब जोतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार’ दिले जात असतात.समतेच्या चळवळीतील कार्य तसेच उपेक्षित आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यां करिता राबविलेल्या विशेष शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचा विचार करून सदर पुरस्कार दिले जातात. अॅग्लो कनिष्ठ शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य मेहमूद गुलाब खाटीक यांच्या अशा प्रकारच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा विचार करून या वर्षाचा ‘तात्यासाहेब जोतिराव फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार’ संघटने मार्फत जाहीर केला जात आहे.
सदर पुरस्कार वितरण सोहळ्या संदर्भात आपल्याशी लवकरच पत्रव्यवहार केला जाईल. आपणास पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.या आशयाचे पत्र भरत आ. शिरसाठ (प्रदेशाध्यक्ष, माध्यमिक विभाग ) यांनी पाठविले आहे.








