शहादा l प्रतिनिधी
समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचे वार्षिक अधिवेशन रविवार दि. 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता अन्नपूर्णा माता मंदिर प्रकाशा ता. शहादा येथे आयोजित करण्यात आले आहे.
समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचे वार्षिक अधिवेशन श्रीक्षेत्र प्रकाशा येथे आयोजित करण्यात आले असून उपस्थितीचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे समाज कार्यकारिणीने मान्य केलेल्या ठराव अंमलबजावणी बाबत चर्चा केली जाणार आहे.
वार्षिक अधिवेशनास समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचे अध्यक्ष दीपक पुरुषोत्तम पाटील, उपाध्यक्ष सुनील श्रीपत पटेल, गोविंद पुरुषोत्तम पाटील, राकेश सुभाष पाटील, शीतल हितांशू पटेल, रविंद्र हांडू गुजर, सुभाष सुदाम पटेल, सेक्रेटरी शिवदास काशिनाथ चौधरी, जनरल सेक्रेटरी मोहन काशिनाथ चौधरी, सुनील सखाराम पाटील, भरत सुदाम पटेल, दीपकनाथ एकनाथ पाटील, सेक्रेटरी हरी दत्तू पाटील, रवींद्र शंकर पाटील, दशरथ विठ्ठल पाटील, दिलीप दगडू पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील, उपाध्यक्ष विमलबेन करसन चौधरी, मंगलबेन मोहन चौधरी, सेक्रेटरी डॉ.सविता अनिल पाटील, डॉ. सतीश नरोत्तम चौधरी, सहसचिव किशोर रतन पटेल, दिलीप दगडू पाटील, डॉ. लतेश ब्रिजलाल चौधरी, डॉ. प्रशांत गिरधर पाटील आदींची उपस्थिती राहणार आहे.
दरम्यान, या वार्षिक अधिवेशनापूर्वी समाजाच्या कार्यकारी मंडळाची संयुक्त सभा अन्नपूर्ण माता मंदिर प्रकाशा ता. शहादा येथे सकाळी 8:30 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेतही विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार असून उपस्थितीचे आवाहन अध्यक्ष समस्त लेवा पाटीदार गुजर समाज दीपकभाई पुरुषोत्तम पाटील यांनी केले आहे, अशी माहिती जनरल सेक्रेटरी सुनील सखाराम पाटील यांनी दिली आहे.








