नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील शिवसेना ठाकरे गटातर्फे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील नेहरू चौकात प्रतिमापूजन व अन्नदान वाटप कार्यक्रम शिवसेनेचे महानगरप्रमुख पंडित माळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीतील स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
नंदुरबार येथील नेहरू चौकात हिंदुरुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमापूजन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. याप्रसंगी अन्नदान करण्यात आले. महानगर प्रमुख पंडित माळी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख सुनील सोनार, शहर प्रमुख राजधर माळी, युवा सेना जिल्हाप्रमुख अर्जुन मराठे, युवती सेना सचिव मालती वळवी, तालुकाप्रमुख रमेश पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितीन जगताप, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष पंडित तडवी, राजेंद्र पाटील, केसरसिंग क्षत्रिय, जितेंद्र मराठे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख सागर पाटील, तालुकाप्रमुख विजय ठाकरे, शहर उपप्रमुख लखन माळी, आनंद पाटील, राहुल चौधरी, राज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.








